Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

मराठा मंडळ कॉलेजचा 64 टक्के निकाल

बेळगाव : बेळगाव शहरातील मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी कॉलेजचा यंदाचा पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल 64 टक्के लागला असून या कॉलेजमधील 533 पैकी 338 विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 38 विद्यार्थी हे विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी कॉलेजमधील आदिती एस. पाटील ही 576 गुण मिळवून …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची 20 ला बैठक

बेळगाव : मराठी परिपत्रकासाठी 27 जूनला होणाऱ्या मोर्चाबाबत जागृतीसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी (ता.20) रोजी दुपारी दोनला तुकाराम महाराज संस्कृतीक भवन, ओरिएंटल स्कूल येथे होणार आहे. मराठीतून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत असल्याने मध्यवर्ती समितीतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीला समिती …

Read More »

महिला विद्यालय शाळेचे प्रभाताई देशपांडे स्कूल असे नामकरण संपन्न

बेळगाव : “जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी तुमच्या मनाची एकाग्रता, धाडस आणि आत्मविश्वास या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण त्याबरोबरच तुम्हाला नैतिक मूल्यांची सुद्धा गरज आहे. या प्रभाताई देशपांडे यांच्या महिला विद्यालय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या बालपणीच नैतिक मूल्याची बिजे पेरणी गेली असल्याने या शाळेचा एकही विद्यार्थी जीवनात वाया जाणार …

Read More »

सीमेवरील आरटीओ चेक पोस्टवर करत सवलत देण्याच्या मागणीसाठी निदर्शने!

बेळगाव : गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील आरटीओ चेक पोस्टवर करात सवलत द्यावी, या मागणीसाठी बेळगावात शनिवारी वाहनचालकांनी जोरदार निदर्शने केली. सीमेवरील आरटीओ चेक पोस्टवर करत सवलत देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक वाहनचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगावातील चन्नम्मा चौकात शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शक वाहनचालकांनी आपल्या मागण्याच्या पूर्ततेसाठी जोरदार घोषणाबाजी केली. …

Read More »

अग्निपथाला विरोधकांनी अग्निकुंड बनविले

एम. बी. जिरली यांची टीका बेळगाव : कारगिल युद्धानंतर भारताच्या तिन्ही सेनादलाच्या विशेष समितीने सैन्य भरती संदर्भात चिंतन करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला होता. सैन्यदलाच्या विशेष समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने देशातील तरुणांना सैन्यात सेवेची भरती मिळावी यासाठी अग्निपथ योजना जाहीर केली. मात्र याच चांगल्या योजनेला अग्निकुंड बनविण्याचे काम विरोधकांनी …

Read More »

स्टार एअर लाईन्स बेळगावातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणार : संजय घोडावत

बेळगाव : आगामी काळात स्टार एअर लाईन्स बेळगावातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती स्टार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय घोडावत यांनी दिली. बेळगावातील क्लब रोडवरील रेमंड्स शोरूमला शुक्रवारी सायंकाळी स्टार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय घोडावत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शॉपिंग करून विविध व्हरायटीचे, डिझाईन्सचे आपल्या आवडीचे कपडे …

Read More »

योग दिनानिमित्त तब्बल 25 तास पाण्यावर तरंगण्याचा उपक्रम

बेळगाव : येत्या 21 जून रोजीचा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त शहरातील योगपटू संजीव हंचिनमनी हे 25 तास पाण्यावर तरंगण्याचा थरारक उपक्रम राबविणार आहेत. योगपटू हंचिनमनी हे 20 जून रोजी सायंकाळी 4:30 ते 21 जून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत आपला हा उपक्रम करतील. काहेर -केएलई अकॅडमी …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतकडून सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन सादर

बेळगाव : येळ्ळूरमधील मुख्य रस्त्यामार्गे गतिरोधक, सिग्नल फलक बसवणे तसेच येळ्ळूर बेळ्ळारी रस्त्याकडेला टाकलेले घाणीचे ढिगारे हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. खानापुर, गुंजी, नंदीहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा या सगळ्या गावातील विटा व वाळू ट्रक टेम्पो व इतर वाहने ये-जा करत असतात त्यामुळे …

Read More »

जायंट्स सखीच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : पर्यावरण दिन आणि नाना चुडासमा यांच्या वाढदिवसानिमित्त जायंट्स सखीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. शाहूनगर येथील मारुती मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका रेश्मा प्रविण पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. नगरसेविका रेश्मा पाटील, अध्यक्षा चंद्रा चोपडे, प्रविण पाटील व इतर पदाधिकाऱ्यांचा हस्ते …

Read More »

वकिलांच्या आंदोलनाला यश!

बेळगाव : गेल्या चार दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद ठेवून बेळगाव वकील संघटनेच्यावतीने कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगावमध्ये यावे यासाठी आंदोलन छेडले होते. तर आजपासून साखळी उपोषणाला ही सुरुवात केली होती. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वकील व बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके तसेच दक्षिणचे आमदार अभय पाटील …

Read More »