बेळगाव : बेळगुंदी क्रॉसवरील गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दीपावलीनिमित्त उत्पादकांना बोनस वाटप करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. ७) रोजी मार्च २०२३ पर्यंत दूध पुरवठा केलेल्या उत्पादकांच्या बँक खात्यात बोनस जमा केला जाईल, अशी माहिती केंद्राचे प्रमुख उमेश देसाई यांनी दिली. ते म्हणाले, म्हैस दुधाला प्रतिलिटर अडीच रुपये तर गाय …
Read More »पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाते तयार करून लुबाडण्याचा प्रयत्न
बेळगाव : पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून लुबाडण्याचा प्रयत्न प्रकार अनेक वेळेला झालेला पाहायला मिळाला आहे. आता पुन्हा एकदा माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे. एम. कालीमिरची व निवृत्त पोलीस निरीक्षक डी.सी. लकण्णावर यांच्या नावे देखील फेसबुकवर बनावट खाते तयार करण्यात आले आहे. याआधी महापालिका आयुक्त …
Read More »मुतगा पीकेपीएस गैरव्यवहार प्रकरणी रमाकांत कोंडूस्कर घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट
बेळगाव : मुतगा पीकेपीएसमध्ये गैरव्यवहाराचा आरोप करत जोपर्यंत व्यवहाराची चौकशी होत नाही तोपर्यंत आपण इथून उठणार नाही असा निर्धार मुतगा येथील शेतकऱ्यांनी केला असून मुतगा येथील युवा शेतकरी सचिन पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुतगा येथील शेतकऱ्यांनी पीकेपीएस संस्थेमध्ये गैरव्यवहार …
Read More »मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये गैरव्यवहार; युवा शेतकऱ्याचे आमरण उपोषण
बेळगाव : मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत या संघाची चौकशी होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा शेतकऱ्यांनी पवित्रा घेतल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते चंद्रकांत कोंडूस्कर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास …
Read More »बेळगावातील 450 खाटांच्या नव्या रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव : मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील
बेळगाव : बेळगावातील 450 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना,वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका मंत्री डॉ. शरण प्रकाश आर. पाटील यांनी केली आहे. शहरातील बिम्स रुग्णालयाच्या आवारातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या सभागृहात शनिवारी (दि. 04) आयोजित बिम्स प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. जिल्हा रुग्णालय …
Read More »दिवाळी सणासाठी वायव्य परिवहन महामंडळातर्फे ५०० हून अधिक विशेष बस व्यवस्था
हुबळी : वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांचा दिवाळी सण साजरा करण्यासाठी आणि उत्सवानंतर परतणाऱ्या सार्वजनिक प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यातील आणि राज्याबाहेरून विविध ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 500 हून अधिक विशेष बसेसची व्यवस्था केली आहे. ११ नोव्हेंबरला शनिवार व रविवार, १२ तारखेला नरक चतुर्दशी, १३ तारखेला सोमवार अमावसे, लक्ष्मीपूजन आणि …
Read More »ठाकरे कुटुंबियांच्या उपस्थितीत केदारनाथमध्ये सीमावासीयांची घोषणाबाजी, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!
बद्रीनाथ- उत्तराखंड : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. तिथे आज सकाळी ते केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांच्यासमोर बेळगावमधल्या सीमाभागातील सीमावासीयांनी घोषणाबाजी केली. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा सीमावासीयांनी केली. तसंच उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काहीच काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत …
Read More »कॅन्डल मोर्चा स्थगित
बेळगाव : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे -पाटील यांनी उभे केलेले आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलेले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बेळगाव येथे कॅन्डल मोर्चा घेण्यात येणार होता परंतु महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाची दिशा 24 डिसेंबर नंतर ठरणार असल्यामुळे हा कॅन्डल मोर्चा काही काळ स्थगित ठेवून …
Read More »मार्कंडेय साखर कारखाना गळीत हंगामाचा शुभारंभ
बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा विधीवत पूजनाने आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. मार्कंडेय साखर कारखाना स्थळी आज सकाळी कारखान्याचे चेअरमन तानाजीराव पाटील यांच्या हस्ते उसाच्या मोळीचे विधिवत पूजन करून ऊस गाळपासाठी टाकण्याद्वारे गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. सवाद्य पार पडलेल्या …
Read More »बेळगाव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बेळगाव : सहकार क्षेत्रातील अग्रेसर दि. बेळगाव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा सत्कार समारंभ ताशिलदार गल्ली येथील सोसायटीच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन राजाराम सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दि. सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विश्वजीत अमृतराव हसबे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर व्हाईस चेअरमन सौ. सुरेखा मेलगे, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta