Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

राष्ट्रस्तरीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या क्रीडापटूला कांस्य

बेळगाव : झारखंड येथील रांची येथे झालेल्या राष्ट्रस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावून बेळगावमधील लक्ष्मी पाटील या क्रीडापटूने बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. बेळगाव तालुक्यातील हलगा बस्तवाड या गावातील कुमारी लक्ष्मी संजय पाटील या क्रीडापटूने कुस्ती स्पर्धेत उत्तम कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले आहे. रांची येथे झालेल्या …

Read More »

सुवर्णसौध परिसराची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून पाहणी

बेळगाव : हलगा येथील सुवर्ण सौध परिसरात काल मंगळवारी शेवया वाळत घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुवर्ण सौध परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत पाहणी केली. सुवर्णसौधच्या देखभाल, स्वच्छता व सुरक्षितेबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील …

Read More »

कोवाडमध्ये विद्युत वाहिनी तारेला सळीचा स्पर्श झाल्याने एक ठार

तिघे जण गंभीर जखमी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड (ता. चंदगड) येथे घराचे बांधकाम सुरू असताना कॉलमची सळी उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला चिकटल्याने शॉक लागून २२ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ बेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. …

Read More »

पाठ्यपुस्तक सुधारणा वाद; शिक्षणमंत्री उद्या देणार अहवाल

अभ्यास करून निर्णय घेणार, लेखक, कवींचा वाढता विरोध बंगळूर : पाठ्यपुस्तक पुनरावृत्ती वादाच्या संदर्भात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश उद्या (ता. २) अहवाल सादर करतील. या अहवालाचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सांगितले. राज्यातील मानसिकतेला हादरवून सोडणाऱ्या वादाच्या संदर्भात सर्वसमावेशक …

Read More »

युवकांचे ‘दादा’ समितीच्या मुख्य प्रवाहात!

बेळगाव : 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी युवकांचे नेते म्हणून परिचित असलेले हिंदुत्ववादी विचारसरणीचे रमाकांत कोंडुस्कर यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला भेट दिली. संघटक वृत्तीचा नेता म्हणून परिचित असलेले रमाकांत कोंडुस्कर हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुख्य प्रवाहात आल्याने मराठी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मागील …

Read More »

हुतात्मा स्मारकासाठी मराठी प्रेमींची भरीव देणगी!

बेळगाव : 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा येथे तालुका समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारक उभारणीसाठी बेळगाव तालुक्यासह परिसरातील समितीप्रेमी मराठी बांधवांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर या स्मारकासाठी शिवसेनेकडूनही शक्य तितकी मदत केली जाईल असे आश्वासन अरुण दुधवाडकर यांनी दिले …

Read More »

प्रजापिता ब्रह्माकुमारीतर्फे वाहतूक सुरक्षेबाबत बेळगावात बाईक रॅली

बेळगाव : बेळगावात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने बुधवारी वाहतूक सुरक्षा उपायांबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली. बुधवारी बेळगावातील महांतेश नगरात वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयातर्फे बाईक रॅली काढण्यात आली. या विशेष कार्यक्रमात ब्रह्माकुमारी राजयोगिनी अंबिका, ११ वे जिल्हा व सत्र न्यायाधीश रमाकांत चव्हाण, डीसीपी पी. व्ही. …

Read More »

राज्यस्तरीय स्पर्धेत अमन सुनगार याचे सुयश

बेळगाव : नेहरूनगर येथील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच्या अमन अभिजीत सुनगार याने अभिनंदनीय यश संपादन केले आहे. कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या सहकार्याने एनआरजे केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च यांनी सदर राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. …

Read More »

गुन्हेगारी नियंत्रणासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज

बेळगाव : शहर आणि परिसरात काही वेळा गुन्ह्यांचे गंभीर प्रकार घडत आहेत. अशा वेळी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाला योग्य माहिती द्यावी. अशी सूचना शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. येथील समादेवी मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस …

Read More »

4 जूनपर्यंत उत्तर भागातील वीज पुरवठा खंडीत

बेळगाव : आजपासून दिनांक 4 जून पर्यंत शहरातील उत्तर भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. शहरातील उत्तर भागातील वीज पुरवठा दुरुस्तीच्या कारणास्तव चार दिवस खंडित करण्यात येणार आहे. उत्तर भागात टप्प्याटप्प्याने दुरूस्ती करण्यात येणार असून रोज वेगवेगळ्या …

Read More »