Monday , September 21 2026
Breaking News

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने ही ऊर्जेचे केंद्रे बनत आहे : रणजित चौगुले

Spread the love

 

बेळगाव : साहित्य संमेलन हे बेळगावातील एक केंद्रबिंदू निर्माण करणारा भाग आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने ही ऊर्जेचे केंद्रे बनत आहे. बेळगाव येथील मराठी साहित्य संस्कृती जतन करण्याचे कार्य येथील अतिशय जीव तोडून करण्याचे कार्य मराठी भाषेपर्यंत असतात त्याच्यामध्ये मराठी भाषा संस्कृती आणि अस्मिता टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. वेळोवेळी होणाऱ्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी माय मराठीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन सेवा करण्याची वृत्ती वेळोवेळी निर्माण करायला हवी तरच आपली भाषा संस्कृती टिकू शकेल, असे प्रतिपादन बेळगाव येथील सरदार हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित ‘५वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2024’ रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी आज सायंकाळी सहा वाजता साहित्य संमेलनाच्या पूर्व तयारी संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीतून विविध विषयाची जबाबदारी देऊन जबाबदारीने कार्य करण्यासाठी व्यापक बैठकीतून वेगळे कार्याची विभागणी करून देण्यात आली याप्रसंगी या बैठकीत विशेष असे नियोजन करून मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासंदर्भात या बैठकीतून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणजीत चौगुले उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर रणजित चौगुले, उपाध्यक्ष राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, संजय गौंडाडकर, परिषदचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे – पाटील, परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील, प्रा. निलेश शिंदे, आप्पासाहेब गुरव, महादेव चौगुले, एम. वाय. घाडी, संजय मोरे, संजय गुरव, सूरज कणबरकर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या आमंत्रण पत्रिकांचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवरांनी भाषणे केली.

स्वागत स्वप्नील जोगानी यांनी केले. प्रास्ताविक परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील यांनी संमेलन भरविण्याचा उद्देश स्पष्ट केला.

यावेळी एम. के. पाटील, मोहन अष्टेकर, एल. पी. पाटील, गणेश दाडीकर, संदिप तरळे, स्मिता चिंचणीकर, गीता घाडी, प्रा.मनिषा नाडगौडा, डॉ. संजीवनी खंडागळे, रोशनी हुंदरे, नेत्रा मेणसे, सविता वेसने, स्मिता किल्लेकर यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक हितचिंतक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *