Monday , September 21 2026
Breaking News

बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात तरुणाची हत्या

Spread the love

 

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात शुक्रवारी सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मंजू कोलकार असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
वकुंद गावातील मंजू आपल्या मित्रासोबत बहिणीला औषध देण्यासाठी होसुर येथे गेला होता. खून मित्रानेच केल्याचा संशय असून मुरुगोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. सदर आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
जमिनीच्या मुद्द्यावरून त्यांच्यात अनेकदा भांडण झाल्याचे सांगण्यात येते. या अनुषंगानेही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *