Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

‘सौजन्या’ बलात्कार -खून प्रकरणी श्रीराम सेनेचे सरकारला निवेदन

  बेळगाव : मंगळूर जिल्ह्यातील धर्मस्थळ येथे 11 वर्षांपूर्वी घडलेल्या 17 वर्षीय सौजन्या या युवतीच्या बलात्कार -खून प्रकरणातील खऱ्या आरोपीला शोधून कठोर शासन करावे. यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे सोपवावे. तसेच याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीराम सेनेतर्फे सरकारकडे करण्यात आली आहे. सौजन्या बलात्कार व …

Read More »

“त्यांची” विचारपूस करून माजी महापौरांची सामाजिक बांधिलकी

  बेळगाव : दोन दिवसापूर्वी रेल्वेत बेशुद्ध अवस्थेत आल्यानंतर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मध्य प्रदेश खंडवा येथील नऊ प्रवाशांचा तब्येतीची विचारपूस करत माजी महापौर विजय मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. पर राज्यातील कामगार गोव्याहून मध्य प्रदेशकडे जात असते वेळी गोवा एक्सप्रेसमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्या …

Read More »

विद्याभारती राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना

  बेळगाव : केरीगुडू मंड्या येथील श्री माधव विद्यालय शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा चमू रवाना झाला आहे. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान स्पर्धा होणार आहे, या स्पर्धेसाठी संत मीरा शालेय संघात देवेश मडकर, आदित्य सानी, सोहम ताशिलदार, अभिषेक गिरीगौडर, अश्विन जायण्णाचे, …

Read More »

वडगाव-यरमाळ रस्त्यावर मद्यपींचा हैदोस

  बेळगाव : वडगाव-यरमाळ रस्त्यावर रात्रीच्यावेळी तळीराम तळ ठोकून बसल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. दररोज रात्री अंधाराचा फायदा घेत रस्त्यावर घोळका करून दारू पित बसलेले दिसत आहेत. काही वेळेस मद्यपानासोबत जुगाराचे डाव देखील रंगत आहेत. या मद्यपींचा त्रास या परिसरातील शेतकरी तसेच महिलांना सहन करावा लागत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे …

Read More »

ईद-ए-मिलादची मिरवणूक 1 ऑक्टोबर रोजी; बेळगावातील मुस्लिम समाजाचा महत्त्वपूर्ण निर्णय

  बेळगाव : हिंदु-मुस्लिम ऐक्य, बंधूभाव कायम राहावा आणि विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण होऊ नये यासाठी 1 ऑक्टोबरला ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बेळगावातील मुस्लिम समाजाने घेतला. यंदा श्री गणेश विसर्जन मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांची ईद-ए-मिलाद मिरवणूक एकाच दिवशी असल्याने गणेश विसर्जन मिरवणूकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न न येता …

Read More »

नामफलकावर कन्नड भाषेला प्रथम प्राधान्य; कानडीकरणाचा महानगरपालिकेकडून फतवा

  बेळगाव : उच्च न्यायालयाने आदेश बजावूनही सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्याकडे दुर्लक्ष करून सापत्न वागणूक देणाऱ्या महापालिकेने आता व्यापारी आस्थापनांच्या नामफलकांचे कानडीकरण करण्याचा विडा उचलला आहे. दुकानांच्या नामफलकांवर ६० टक्के जागेत कन्नड भाषेत मजकूर लिहिण्यात यावा, असे पत्रक आयुक्त अशोक दुडगंटी यांनी काढले आहे. स्थानिक लोकांच्या भाषेत व्यवहार …

Read More »

बेळगाव नेहरुनगर येथील पेट्रोल पंपावर बर्निंग कार

  बेळगाव : बेळगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरताना एका कारने पेट घेतला आहे. पेट्रोल पंपाच्या आवारात कारच्या समोरील भागाला अचानक आग लागल्याने मोठा अनर्थ घडला असता. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नेहरुनगर येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या स्वीफ्ट कारला आग लागली, कर्मचाऱ्यांनी आग विझवल्याने भीषण अपघात टळला. आग लागताचं तितक्यात …

Read More »

मराठा मंडळ अध्यक्षपदी राजश्री नागराजु (हलगेकर) यांची फेरनिवड

  बेळगाव : मराठा मंडळच्या नुतन अध्यक्षा म्हणून सौ. राजश्री नागराजु (हलगेकर) यांची तर उपाध्यक्षपदी विनायक बसवंतराव घसारी यांची एकमताने निवड झाली. कार्यकारिणी समितीची बैठक सोमवार दि. 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री. नागेशराव एस. झंगरूचे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सौ. राजश्री नागराज यांनी गेली 18 वर्षे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला असून त्यानी …

Read More »

वास्को-निजामुद्दीन रेल्वेत सापडले 8 प्रवासी बेशुद्धावस्थेत; बेळगाव येथील रुग्णालयात दाखल

    बेळगाव : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या वास्को-निजामुद्दीन रेल्वेतून प्रवास करणारे मध्य प्रदेशातील आठ प्रवासी बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोंढा स्थानक सोडल्यानंतर एकाच डब्यातून प्रवास करणाऱ्या आठ प्रवाशांना दोन वेळा उलट्या झाल्या. मग जे झोपले ते कधीच उठले नाहीत. सहप्रवासी जागे झाले पण त्यांनी …

Read More »

निलजी येथील ब्रह्मलिंग मंदिर आणि नावगे गावच्या रामलिंग देवस्थानास आर. एम. चौगुले यांची भेट

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील निलजी गावातील जागृत ब्रह्मलिंग मंदिर आणि नावगे गावाच्या रामलिंग देवस्थानाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी भेट दिली. श्रावण मासातील शेवटच्या सोमवार निमित्ताने तालुक्यातील विविध गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर. एम. चौगुले यानी दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. …

Read More »