Monday , March 9 2026
Breaking News

बेळगाव

खादरवाडी येथील दहा जणांना जामीन

  मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर बेळगाव : खादरवाडी येथील जमिनीच्या वादातून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील चौघांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्या चौघांना जामीन मंजूर करण्यात आला तर आणखी सहा जणांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने दिला आहे. खादरवाडी येथील जनतेवर नाहक गुन्हे …

Read More »

महिलांकरिता आयोजित बाईक रॅली उत्साहात संपन्न

  बेळगाव : आपली भारतीय संस्कृती टिकावी व महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता एंजल फाउंडेशन यांच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये महिलांनी विविध पारंपारिक वेशभूषा परिधान केला होता. बाईक रॅलीचे उद्घाटन कॅम्पच्या पीएसआय रुक्मिणी, एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. त्यानंतर ही बाईक …

Read More »

‘ब्रह्माकुमारी’च्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन

  बेळगाव : बेळगावजवळील हलगा गावात ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांची सविस्तर माहिती देताना राजयोगिनी बी.के. शांता म्हणाल्या की, सामान्य शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आजकाल आमची सर्व मुलं जी शेतकरी वर्गातली आहेत ती पुढील शिक्षणानंतर …

Read More »

बेळगाव ग्रामीण भाजपच्या वतीने सुशासन दिन साजरा

  बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव ग्रामीण कार्यालयात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा सुशासन दिन आज सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, बेळगाव ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत आणि धनश्री सरदेसाई या मान्यवरांसह प्रमुख वक्ते …

Read More »

अटलबिहारी वाजपेयी एक आदर्श व्यक्तिमत्त्व : किरण जाधव

  बेळगाव : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एक अजातशत्रू होते. एक राजकारणी, एक व्यक्ती कसा असावा हे त्यांनी आपल्या जीवन कार्यातून दाखवून दिलं, असे विचार भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी व्यक्त केले. विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी …

Read More »

महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी संकेश्वर पोलिस स्टेशनचे पीएसआय निलंबित

  बेळगाव : तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पोलीस स्टेशन पीएसआयला निलंबित करण्यात आले आहे. संकेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय नरसिंहराजू जे. डी यांना निलंबित करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशानुसार नरसिंहराजू यांना कर्तव्यात कसूर, अनुशासनहीनता आणि गैरवर्तणूक केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. काही …

Read More »

वकील मारुती कामाण्णाचे यांच्याकडून वकील संघास मेडिकल किट

  पुण्यातील स्पर्धेसाठी बेळगाव वकील संघ रवाना बेळगाव : ऍडव्होकेट युनायटेड इलेव्हन पुणे महाराष्ट्र व पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वकिलांची राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी बेळगाव बार असोसिएशनचा संघ रवाना झाला. या संघाला ज्येष्ठ वकील डी. एम. पाटील, ऍड. आर. पी. पाटील, ऍड. सी. …

Read More »

बेळगावात राष्ट्रीय कृषी दिन वेगळ्या पद्धतीने साजरा

  बेळगाव : बेळगावातील शेतकऱ्यांनी शेतात मद्यपींनी फेकलेल्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, पिशव्या आणि कचरा जमा करून राष्ट्रीय कृषी दिन आज एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला. बेळगावातील येळ्ळूर-वडगाव रस्त्यावरील शेतकर्‍यांच्या शेतात रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी दारूची पार्टी करून बाटल्या व इतर वस्तू फेकत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या मशागतीच्या कामात अनेक …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते पी. जे. घाडी राष्ट्रीय समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

  शिक्षक विकास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न बेळगाव : शिक्षक विकास परिषदेचे 27 वे राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन 9 आणि 10 डिसेंबर दरम्यान गोव्यातील शिरोडा येथे पार पडले. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये आनंदनगर, वडगांव-बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते परशराम जोगाण्णा घाडी यांना अधिवेशनात राष्ट्रीय समाज भुषण …

Read More »

आयआरसीएस बेळगावला सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार

  बेळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी (आयआरसीएस) बेळगाव जिल्हा शाखेला 2021-22 या वर्षातील सर्वांगीण उपक्रमांच्या श्रेणीमध्ये ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा शाखा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे. राजभवन, बेंगलोर येथे गेल्या मंगळवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून आयोजित सोहळ्यात कर्नाटकचे राज्यपाल आणि रेड क्रॉस सोसायटी, कर्नाटक राज्य शाखा, बेंगळुरूचे अध्यक्ष …

Read More »