Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी पोलीस आयुक्तांना निमंत्रण

बेळगाव : बेळगावची ऐतिहासिक शतकपूर्ती शिवजयंती आणि शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी शहराचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच मिरवणूक उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रीत केले. शहरात येत्या 2 ते 4 मे या कालावधीत साजरा …

Read More »

श्री तुळजा भवानी महिला मंडळाचे उद्घाटन थाटात

बेळगाव : शहरातील बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्या श्री तुळजा भवानी महिला मंडळाचा उद्घाटन समारंभ काल रविवारी थाटात पार पडला. बापट गल्ली येथे आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर आमदार ॲड. बेनके यांच्या हस्ते महिला मंडळाचे …

Read More »

बेळगावात महिला सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे स्वागत

बेळगाव : महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने बेंगळूरहून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे मंगळवारी बेळगावात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बंगळूर मालगुडी आणि रोटरी ई-क्लब ऑफ बंगळूर सखी यांच्यातर्फे 30 दिवसात 30 जिल्ह्यात 3500 किमी अंतराची बाईक रॅली काढण्यात आली आहे. महिला सुरक्षेबाबत जनजागृती …

Read More »

शंकर मारिहाळ यांना एसपी पदी पदोन्नती

बेळगाव : बेळगावात सेवा बजावुन लोकांची मने जिंकलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी शंकर मारिहाळ यांना एसपी पदी पदोन्नती मिळाली आहे. हुबळी येथील हेस्कॉम जागृती दलाच्या एसपी पदी त्यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. होय, शंकर मारिहाळ यांनी यापूर्वी बेळगावात मार्केट पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर, डीवायएसपी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. सध्या ते …

Read More »

बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व हसन मुश्रीफ यांची भेट

मुंबई : बेळगांव जिल्ह्यातील मराठी पत्रकारांच्या समस्यांबाबत बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापुरकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, चंदगडचे आमदार राजेश पाटील, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी बोलताना ना. अजितदादा पवार म्हणाले की, …

Read More »

येळ्ळूर येथे अज्ञाताचा खून करून मृतदेह टाकला

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा खून झाला असावा अशी शंका आहे. खून झालेल्या अवस्थेतील अज्ञाताचा मृतदेह आढळून आल्याने येळ्ळूर गावात एकच खळबळ उडाली आहे. कोणीतरी त्याचा खून करून मृतदेह गावात टाकून दिला अशी चर्चा आहे. काल रात्री ही घटना घडल्याचा कयास आहे. …

Read More »

रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : रेड क्रॉस संस्था बेळगाव व संत निरंकारी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानव एकता दिवसानिमित्त येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचविण्याकरिता हातभार लावला. यावेळी अध्यक्षस्थानी मारुती मोरे होते. तसेच व्यासपीठावर डॉक्टर डी. एन. मिसाळे, कर्नल विनोदिनी शर्मा, मुख्याध्यापक …

Read More »

गुरुवंदना कार्यक्रमासाठी सकल मराठा समाजाचे श्री भगवानगिरी महाराजांना, निपाणी सरकाराना निमंत्रण

बेळगाव : सकल मराठा समाज बेळगावच्या सदस्यांनी काल रविवारी कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील मराठा समाजाच्या रामनाथगिरी (समाधी) मठाचे मठाधिपती जगतगुरु राष्ट्रीय धर्माचार्य श्री श्री भगवानगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्याद्वारे त्यांना ‘गुरुवंदना’ कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. श्री श्री भगवानगिरी महाराज यांना हल्लीच काशी धर्म पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य, स्वामी …

Read More »

आ. श्रीमंत पाटील यांचा आराधना महोत्सवात सहभाग

अथणी : उगार बुद्रूक येथील ग्रामदेवता पद्मावती मंदिरात नुकतीच महामंगल आराधना महोत्सवाला सुरवात झाली. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी सहभाग घेऊन देवीचे दर्शन व महास्वामींचा आशिर्वाद घेतला. हा आराधना महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. या महोत्सवात श्रीक्षेत्र सोंदा मठाचे जगद्गुरू अकलंकेसरी स्वस्तिश्री भट्टाकलंक भट्टारक स्वामी, श्रीक्षेत्र …

Read More »

गुंडेवाडी-चमकेरी रस्त्यासाठी 25 लाख

आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून प्रयत्न : रस्ता कामास प्रारंभ संबरगी : गेल्या अनेक दिवसांची मागणी असलेल्या गुंडेवाडी-चमकेरी रस्ताकामाचा नुकताच प्रारंभ झाला. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन याचे उद्घाटन झाले. सदरचा रस्ता बराच खचला होता. त्यामुळे येथून ये-जा करणार्‍या जनतेची अडचण होत होती. याचा विचार …

Read More »