Sunday , July 26 2026
Breaking News

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वतीने “शिवप्रताप दिन” साजरा

Spread the love

 

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने आज मंगळवार रोजी मार्गशीर्ष शुध्द सप्तमी या दिवशी छत्रपती श्री शिवाजी उद्यान येथे “शिवप्रताप दिन” साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला विधीवत अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर जिल्हाप्रमुख श्री. विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख श्री. अनंत चौगुले यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तसेच शिवरायांची आरती म्हणण्यात आली. स्वराज्यावर चालून आलेल अफजल खानच्या रूपाने संकट शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढून त्या अफजल खानाचा वध केला. अधर्मावरती धर्माच्या विजयाचं प्रतीक म्हणून समस्त शिवभक्त “शिवप्रताप दिन” साजरा करतात, अशी माहिती यावेळी जिल्हाप्रमुख श्री. विश्वनाथ पाटील यांनी दिली. त्यानंतर हे ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला कर्नाटक प्रांत प्रमुख श्री. किरण बापू गावडे, अनगोळ-वडगाव विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, विभाग प्रमुख प्रफुल शिरवळकर, प्रमोद चौगुले, किरण बडवानाचे, युवराज पाटील, विजय कुंटे, मारुती पाटील, गजानन निलजकर, अतुल केसरकर, अजित जाधव, राहुल कुरणे, केतन मयेकर, कपिल कुरणे तसेच अनेक शिवभक्त उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *