बेळगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने आज सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डेंगू प्रतिबंधक लस देऊ केली आहे. येथील फुलबाग गल्ली मधील शाळा नंबर सात मध्ये विद्यार्थ्यांना डेंगू प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या हस्ते …
Read More »जैन स्वामींजींच्या हत्येप्रकरणी : दोघा संशयितांना अटक
बेळगाव : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या हिरेकोडी आश्रमातील एका जैन साधूची हत्या करण्यात आली आहे. हिरेकोडी आश्रमाचे आचार्य कामकुमार नंदी महाराज गेल्या बुधवारी बेपत्ता झाले होते. रायबाग तालुक्यातील कटकबावी गावात महाराजांची हत्या झाल्याची पोलिसांना माहिती आहे. बेळगावचे एसपी संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी …
Read More »मंगाईदेवी यात्रेत भक्तांना अडथळा; मंदिर मार्गावर भिंत बांधल्याने नाराजी
बेळगाव : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवस्थान पासून मंगाईनगर पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. यामुळे मंगाईनगर येथील रहिवाशांना मंदिराकडे येण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर वळसा घालून यावे लागत आहे. यामुळे गैरसोय होत असून रहिवाशांना मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी मंगाई नगर रहिवाशी संघाने केली आहे. वडगावची …
Read More »हिरेकुडी येथील बेपत्ता जैन मुनीचा संशयास्पद मृत्यू
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा मृतदेह शुक्रवारी रात्री संशयास्पदरित्या आढळला आहे. चिकोडी हिरेकुडीमधून जैन मुनी बेपत्ता झाल्याची तक्रार चिकोडी पोलिसात नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा या जैन मुनींचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला असून त्यांच्या शरीरावर जखमा …
Read More »वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पोलीस चौकीचे काम
बेळगाव : छत्रपती धर्मवीर संभाजीराजे परिसरातील पोलीस चौकीचे काम एक दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. यासंदर्भात खडेबाजार एसीपी अरुणकुमार कोळूर यांना मराठा समाजाचे नेते किरण जाधव व छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता कॅम्प येथील एसीपी …
Read More »राज्याचा अर्थसंकल्प दिशाहीन : डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली. सिद्धरामय्या म्हणाले की, आमचा मंत्र ‘सर्वांसाठी समान वाटा, सर्वांना समान अधिकार’ आहे. विकास आणि सामाजिक न्यायासाठी अर्थसंकल्प मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. हे हास्यास्पद आहे. …
Read More »सराफ गल्ली श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक तसेच स्थापना व अभिषेक कार्यक्रम भक्तिभावाने साजरा
बेळगाव : सराफ गल्ली, शहापूर येथील मराठा पंच कमिटीतर्फे आयोजित श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक तसेच स्थापना व अभिषेक कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी मोठ्या भक्तिभावाने पार पडला. सराफ गल्ली कोपऱ्यापासून काल सायंकाळी श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीमध्ये मराठा पंच कमिटीचे सदस्य …
Read More »विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
बेळगाव : बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ३० ते ३५ हजार नुकसान भरपाई द्यावी, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र निधी ठेवावा, बेळगावात बायपास किंवा रिंगरोडऐवजी उड्डाणपूल बांधण्यात यासह विविध मागण्यांसाठी आज बेळगाव जिल्हा शेतकरी संघटनेसह इतर संघटनांच्यावतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना विविध मागण्यांचे …
Read More »बस्तवाड हायस्कूल येथे कै. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूल येथे कै. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि मराठा मंडळ विश्वस्त कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र मोदकेकर हे होते. विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कैलासवासी सुवर्णाताई मोदगेकर फोटो पूजन नगरसेवक शिवाजी …
Read More »महिलांमध्ये अशक्याचे शक्य करण्याची शक्ती : सुधा भातकांडे
कडोलकर गल्लीत फॅशन ट्रेंड्स ब्युटिकच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन बेळगाव : महिलांनी स्वतःहून ठरवले तर, कोणतीही गोष्ट आज अशक्य नाही. घरदार सांभाळून स्वतःचे कौशल्यावर त्या पुढं येतात. याच उदाहरण आपणा समोर आहे. इतर महिलांनी खटावकर यांचा आदर्श घेऊन पुढं वाटचाल करावी, असे मत सुधा भातकांडे यांनी व्यक्त केले. हिंडलग्यात कार्यरत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta