Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मानकरी चैतन्य कारेकर याचा ‘बिट ब्रेकर्स’ने केला सन्मान

  बेळगाव (प्रतिनिधी) : मध्य प्रदेश -भोपाळ येथे झालेल्या 66 व्या नॅशनल स्कूल गेम्स 2022 ॲथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात बेळगावच्या चैतन्य श्रीधर कारेकर याने सुवर्णपदक पटकाविले. चैतन्याने 110 मीटर अडथळ्याची शर्यत अवघ्या 14. 431 सेकंदात पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. टिळकवाडी येथील जीएसएस विज्ञान महाविद्यालयात पदवीपूर्व …

Read More »

इमारतीला रंग काम करताना चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

  बेळगाव : इमारतीला रंग लावताना चौथ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी नेहरुनगर येथील केएलई कॅम्पसमध्ये ही घटना घडली असून यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निजाम हसनसाब जमादार (वय ४८) रा. सातवा क्रॉस, आझमनगर असे त्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी दुर्लक्षपणाचा …

Read More »

बोलण्याच्या बहाण्याने दिशाभूल करून मोबाईल लांबविला

  बेळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी युवकाची दिशाभूल करत मोबाईल पळविल्याची घटना हिंडलगा गणपतीजवळील गांधी चौकात मंगळवारी (ता. १४) रात्री घडली. बेळगावात काम करणारा आंबेवाडी येथील युवक संचित पाटील आपले नेहमीचे काम संपवून रात्री आठच्या सुमारास घराकडे परतत असता लघुशंकेसाठी म्हणून गांधी चौकात थांबला असता, दोघे युवक दुचाकीवरून त्या ठिकाणी …

Read More »

निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युटला टाळे ठोकून शेतकऱ्यांची निदर्शने!

  बेळगाव : सुनावणीसाठी येण्याची नोटीस देऊनही स्वतः हजर न झालेल्या साखर आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत आंदोलकांनी शुक्रवारी निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यालयाला टाळे ठोकून निदर्शने केली. सुनावणीसाठी येण्याची नोटीस देऊनही स्वतः हजर न झालेल्या साखर आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत बेळगावातील गणेशपूर रोड येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यालयाला टाळे ठोकून …

Read More »

बेळगाव शहरात पंधरा टक्के पाणी कपात

  बेळगाव : मान्सून लांबल्यामुळे बेळगाव शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जलाशयातील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे शहर पाणीपुरवठ्यात 15% कपात करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या काळात शहरातील कुपनलिका, विहीर व हातपंप यांचाच आधार बेळगावकरांना राहणार आहे. कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळ व एल अँड टी कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार …

Read More »

येळ्ळूर येथील व्यक्तीची अनगोळ येथे निर्घृण हत्या

  बेळगाव : येळ्ळूर येथील एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून किंवा धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना अनगोळ तलावा शेजारील शेतवाडीमध्ये आज गुरुवारी उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीचे नाव संजय तुकाराम पाटील (वय 34, रा. जिजामाता गल्ली, येळळूर) असे असून त्याला दारूचे व्यसन होते. मिळालेल्या …

Read More »

रोटरीच्यावतीने बेळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेनुग्राम बेलगाम यांच्या वतीने शनिवार दिनांक 17 जून रोजी येथील ज्योती कॉलेज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, रोटरी वेणूग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना रामगुरवाडी म्हणाले, रोटरी वतीने विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबविले …

Read More »

पारिजात कॉलनीत दुसऱ्यांदा गटार बांधकाम करून भ्रष्टाचार; रमाकांत कोंडुस्कर

  बेळगाव : वडगाव- अनगोळ रोड येथील पारिजात कॉलनी येथे सहा महिन्यात दुसऱ्यांदा गटार बांधकाम करून जनतेच्या पैशाची उधळण होत आहे. प्रशासनाने भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी केली आहे. पारिजात कॉलनी येथे सहा महिन्यापुर्वी गटारीचे बांधकाम करण्यात आले होते. पण गटारीच्या शेजारील जागेत …

Read More »

ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा यशस्वी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

  बेळगाव : ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार दि. १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते. त्यांनी आजवर झालेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या चर्चेत ऍड. सुधीर चव्हाण, कॉ. सुभाष कंग्राळकर, प्रा. दत्ता …

Read More »

अपघातात जखमी झालेल्या युवकाचे निधन

  बेळगाव : खानापूर जवळ झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे. शुभम लक्ष्मीकांत जाधव रा. शास्त्री नगर बेळगाव बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. खानापूर येथून येत असतांना गेल्या गुरुवारी 8 जून रोजी हत्तरवाड जवळ घडलेल्या दुर्दैवी अपघातात शुभम गंभीर …

Read More »