चिक्कोडी : भरधाव दुचाकी व टेंपोमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीवरील एकाच गावातील तिघे युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना चिक्कोडी तालुक्यातील बसवनाळगड्डे येथे मंगळवारी रात्री उशिरा घडली. केरूर गावचे प्रशांत भैरू खोत (वय 33), सतीश कलाप्पा हिरेकोडी (वय 32) आणि यलगौडा चंद्रकांत पाटील (वय 33) अशी अपघातात ठार …
Read More »सुनेकडून सासूची हत्या!; बैलहोंगल येथील घटना
बेळगाव : पती आणि सासूवर हल्ला करून सासूची हत्या केल्याची घटना बैलहोंगल येथे घडली. महाबूबी याकुशी (५३) असे मृत सासूचे नाव आहे. मेहरुणी याकुशी या महिलेने ही हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पती सुबान दुसरे घर बांधत नसल्याने पत्नीने हे कृत्य केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिने आपल्या दोन …
Read More »गांधीनगर ते पिरनवाडीपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज; जागेची पाहणी
बेळगाव : बेळगाव शहरांमध्ये फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची आखलेली योजना आता प्रत्यक्षात उतरवण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुढाकार घेतला असून त्यासंदर्भात त्यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. गांधीनगरपासून थेट पिरनवाडीपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची योजना आहे. राष्ट्रीय महामार्गावरून बेळगाव शहरात प्रवेश करण्याच्या मार्गावर उड्डाणपूल व सर्व्हिस …
Read More »वीज दरवाढ विरोधात चव्हाट गल्ली महिलांचा मोर्चा
बेळगाव : अन्यायी अवास्तव वीज दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी आणि पूर्वीप्रमाणेच विज बिल आकारले जावे या मागणीसह पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा करावा या मागणीसाठी चव्हाट गल्ली येथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. सार्वजनिक महिला मंडळाच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी चव्हाट गल्ली येथील महिलांनी उपरोक्त …
Read More »स्त्रीशक्ती योजनेचा परिवहन मंडळांना फायदा : मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : परिवहन मंडळांना स्त्रीशक्ती योजनेचा फायदा होईल, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्त्रीशक्ती योजनेंतर्गत राज्यातील महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या …
Read More »भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात उद्योजकांचा भव्य मोर्चा
बेळगाव : औद्योगिक वीज बिलात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील उद्योजकांनी आज एल्गार पुकारला. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना दरवाढ मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. बेळगावातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी, उद्योजकदेखील वीज दरवाढीमुळे त्रासले आहेत. हेस्कॉमने दुप्पट-तिप्पट वीजबिले पाठवण्याचा सपाट सुरु …
Read More »बेळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती द्या : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रकल्पांबाबत प्रगती आढावा बैठक बेळगाव : रेल्वे, पाटबंधारे, महामार्ग, रिंग रोड उड्डाणपूल बांधकाम, भूसंपादन पुनर्वसन आदी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित प्रत्येक प्रकल्पाच्या अंमलबजावणी प्रक्रियेला गती द्यावी, या प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या तांत्रिक समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या. आज मंगळवार १३ जून …
Read More »मोफत बस प्रवासासाठी झेरॉक्स प्रती ग्राह्य
बेळगाव : रविवारपासून कर्नाटक काँग्रेसच्या शक्ती योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेला महिला वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करताना ओळळखपत्राची झेरॉक्स प्रत किंवा मोबाईलमधील डिजी लॉकर मधील कोणतेही ओळखपत्र दाखवून मोफत बस प्रवास करता येणार आहे, असे स्पष्टीकरण राज्य परिवहन मंडळाने दिले आहे. राज्यात …
Read More »ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा समितीची आज बैठक
बेळगाव : ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा समितीची बैठक मंगळवार दि. १३ जून रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. गिरीश काँप्लेक्स, कार पार्किंग एरिया, रामदेव गल्ली, बेळगाव येथे ही बैठक होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.
Read More »बेपत्ता व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत
बेळगाव : बेळगावमधील श्रीनगर गार्डन परिसरात असलेल्या उड्डाणपुलाखाली डॉ. उमेश रोहिल्ला नामक व्यक्ती बेघर असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनात आले. सदर व्यक्तीला स्मृतिभ्रंश झाला असून त्या व्यक्तीला मदत करण्याच्या हेतूने जागरूक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर हि बाब घातली आणि आज पोलीस आणि १०८ रुग्णवाहिकेचा माध्यमातून बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक स्वास्थ्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta