Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

पहिले रेल्वे गेट शनिवारी पूर्ण दिवस बंद

बेळगाव : रेल्वे खात्याकडून डब्लिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे लेव्हल क्रॉसिंग गेट नं. 383 अर्थात टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट शनिवार दि. 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रविवार दि. 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिक आणि वाहनचालकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे …

Read More »

पत्रकाराच्या घरात चोरी; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

बेळगाव : घरात कोणी नसलेले पाहून दरवाज्याची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बेळगाव शहरातील गणेशपुर सरस्वती नगर येथे गुरुवारी घडली आहे. बेळगाव येथील दैनिक सकाळचे क्रीडा प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांच्या घरी ही चोरी झाली असून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास …

Read More »

शिक्षक के. एन. पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

येळ्ळूर : सुळगे (येळ्ळूर) येथील श्री भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयांमध्ये गेल्या 38 वर्षांपासून सेवा बजावत असलेले विज्ञान विषयाचे शिक्षक के. एन. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप असा संयुक्त कार्यक्रम बुधवार ता. 16 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते यल्लाप्पा कुकडोळकर हे होते. प्रारंभी विद्यालयाच्या विद्यार्थिनीनी …

Read More »

बेळवट्टी गावचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात निवेदन

बेळगाव : बेळवट्टी गावाचा वीज पुरवठा दररोज खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे येथील गावातील अनेक कामे करण्यास व्यत्यय येत आहे, त्यामुळे या समस्येला कंटाळून आज बेळवट्टी गावच्या ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी गांधीनगर येथील हेस्कॉम कार्यालयाला भेट देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा याबाबत निवेदन दिले. बेळवट्टी गावांमध्ये वीज पुरवठा सातत्याने …

Read More »

वकिलांना मारहाण केल्यामुळे; कामकाजावर बहिष्कार

बेळगाव : पोलिसांनी वकिलांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची घटना आज गुरुवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार काल बुधवारी रात्री कॅम्प येथील आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. हे भांडण तेथे उपस्थित असलेल्या कांही वकिलांनी सोडवून मारामारी …

Read More »

हॉटेल फेअरफिल्ड मॅरियटमध्ये चोरी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बेळगाव : शहराच्या बाहेरील काकती येथे असलेल्या मॅरियट येथील प्रतिष्ठित स्टार हॉटेल फेअरफिल्डचे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांवर सुरक्षेशी तडजोड करणे आणि पाहुणे नसताना हॉटेल रूमचा गैरवापर केल्याप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुमारे 9 ते 10 लाख रुपये किमतीच्या हिऱ्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार स्थानिक काकती पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात …

Read More »

मालतीबाई साळुंखे हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

बेळगाव : मालतीबाई साळुंखे हायस्कूल टिळकवाडीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एन. मन्नोळकर सर होते. प्रमुख अतिथी माधुरी जाधव फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. माधुरी जाधव, सौ. स्मिता शिंदे, शुभम दळवी, श्री. मंगेश देवलापूरकर, समाजसेवक श्री. शांताराम कडोलकर व सर्व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर …

Read More »

हिजाब संदर्भात उद्या मुस्लीम संघटनांकडून ‘कर्नाटक बंद’ची हाक

बेंगळुरू : हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालाबाबत खेद व्यक्त करण्यासाठी राज्यातील विविध मुस्लिम धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी उद्या गुरुवार दि. 17 मार्च रोजी ‘कर्नाटक बंद’ पुकारला आहे. बेळगावच्या अंजुमन इस्लाम आणि उलेमांनी सर्व मुस्लिम बांधवांना उद्या त्यांचे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकातील मुस्लिम संघटनांनी संयुक्तरीत्या …

Read More »

रेशन दुकानदाराविरोधात राजहंसगड गावात एकजूट!

बेळगाव : राजहंसगड येथील रेशन दुकान पंचकमिटी मार्फत चालविण्यात यावे असे सर्वानुमते ठरले असताना येथील एका राजकीय वरदहस्त लाभलेल्या गृहस्थाने सदर रेशन दुकान आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करून घेतल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. राजहंसगड येथील रेशन दुकान हे गावपंचांच्या नावाने होते. मात्र एका व्यक्तीने सदर दुकान …

Read More »

युद्धात मध्यस्थी करा : बार असोसिएशनची पंतप्रधानांना विनंती

बेळगाव : रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद मिटवून तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यात तातडीची बैठक आयोजित करण्यास पुढाकार घ्यावा, अशी विनंती वजा मागणी बेळगाव बार असोसिएशनने एका निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे. बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. …

Read More »