बेळगाव : कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित करून सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण करण्याबरोबरच दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवर दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आज मंगळवारी होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी येत्या 26 जून 2023 रोजी होणार आहे. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध …
Read More »मद्यपीचे चक्क गटारीत वास्तव्य, बेळगावातील प्रकार
बेळगाव : दारूच्या नशेत कोण काय करेल याचा नेम नाही. मात्र बेळगावात एका तळीरामाने आगळाच प्रताप केलाय. दारूच्या नशेत त्याने चक्क 2 दिवस गटारीतच वास्तव्य केले. काही नागरिकांच्या जागरूकतेमुळे त्याला बाहेर काढण्यात आले. बेळगावातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या एका गटारीत एक मद्यपी अडकल्याचे आज काही नागरिकांना दिसून आले. फुटक्या …
Read More »शिवजयंती मिरवणूक डाॅल्बीमुक्त करण्याचा मंडळांचा निर्णय; मार्केट पोलिस ठाण्यात बैठक
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवारी दि. 27 मे रोजी उत्साहात साजरा होणार आहे. मिरवणुकीत कुणीही डाॅल्बी लावणार नाही, असा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. पोलिस प्रशासनानेही डाॅल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा सूचना दिल्या. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मार्केट पोलिस ठाण्यात शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांंसोबत बैठक झाली. हा …
Read More »नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घनकचरा विल्हेवाट युनिटसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कामांसाठी तातडीने निविदा मागवून कामाला सुरुवात करावी, काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने बिल अदा करावे, अशा …
Read More »जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक संपन्न
बेळगाव : पावसाळा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची प्राणहानी होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना राबवा अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज सोमवारी आयोजित जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या सभेप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते …
Read More »भारत विकास परिषदेतर्फे दहावी-बारावीत शहरात प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी सन्मानित
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान रविवारी सायंकाळी जी. जी. सी. सभागृहात आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून जी. एस्. एस्. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणव पित्रे उपस्थित होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सदस्य प्राचार्य व्ही. एन्. जोशी व पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी सहसचिव विनायक …
Read More »केएसआरटीसी बस- कार यांच्यात भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी
कागवाड : कागवाड तालुक्यातील ऊगार बुद्रुक गावाजवळ केएसआरटीसी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. सदर घटना मिरज-जमखंडी राज्य महामार्गावर घडली असून या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाराष्ट्रातील मिरज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पाच जणांची …
Read More »राजहंसगड किल्ल्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील दान पेटी चोरीला
बेळगाव : राजहंसगड किल्ल्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील दान पेटी चोरल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. अज्ञातांनी सध्या गावातील नागरिक यात्रोत्सवात गुंतल्याचा फायदा घेत दान पेटी तोडून त्यातील रक्कम लंपास केली आहे. त्यामध्ये जवळपास 30 ते 40 हजार रूपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी गावात यात्रोत्सव मोठ्या …
Read More »शांततेत आणि सलोख्याने शिवजयंती चित्ररथ मिरवणूक संपन्न व्हावी
मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची बैठक संपन्न बेळगाव : येत्या २७ मे २०२३ रोजी होणाऱ्या श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची व्यापक बैठक रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता साईगणेश सोसायटी सभागृह बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे संपन्न …
Read More »शिवजयंती चित्ररथ मिरवणूकीत डीजे लावू नये; मंडळांना एसीपींनी केल्या सूचना
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत साऊंड सिस्टीमला थारा देऊ नये, चित्ररथासह मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा सूचना खडेबाजार विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अरुणकुमार कोळ्ळूर (ACP) यांनी केल्या. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी, विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांची खडेबाजार पोलिस ठाण्यात बैठक झाली. त्यावेळी कोळ्ळूर बोलत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta