Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून बेळगावच्या युवकाची नियुक्ती

  बेळगाव : केळकर बाग बेळगाव येथील युवक अभिषेक जाधव यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली आणि राज्य सरकारचे समन्वयक म्हणून काम नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांची महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. अभिषेक जाधव हे केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत. नवी दिल्ली येथील …

Read More »

“पाकिस्तान झिंदाबाद”च्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा : ऍड. एम. बी. जिरली

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच बेळगाव आरपीडी मतमोजणी केंद्राजवळ पाकिस्तान झिंदाबाद नारा देणाऱ्या बदमाशांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी केली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी शहरातील भाजप कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, काल मतमोजणीवेळी, शहरातील मतमोजणी …

Read More »

भाजप कार्यकर्त्यांनी गवतगंजीवर फटाके टाकल्याने आग लागून मोठे नुकसान

  धामणे येथील प्रकार : पोलिसांची बघ्याची भूमिका बेळगाव : अतिउत्साही भाजप कार्यकर्त्यांनी धामणे येथे घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी समिती कार्यकर्त्यांच्या घरासमोर केली. आतषबाजी करताना फटाके गवताच्या गंजीवर टाकल्याने गवतगंजीला आग लागली. त्यामुळे शेतकरी भैरू धर्मूचे आणि ग्रा. पं. सदस्य एम. आर. पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे. धामणे येथील …

Read More »

माजी नगरसेविकेचे घर जाळण्याचा प्रयत्न! ; पोलिसांत गुन्हा दाखल

  बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या घरावर दगड फेकून आणि घरात फटाके फोडले. अभय पाटील यांची मिरवणूक निघाली असताना होसुर येथील सुधा भातकांडे यांच्या घरावर मिरवणुकीतील काही जणांनी दगडफेक करून सी सी टी व्ही कॅमेरा …

Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक हरिभाऊ वझे यांचे निधन

  बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक माननीय श्री. हरिभाऊ वझे यांचे दिनांक 13 रोजी दुःखद निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. ते 1956 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते ते मूलतः बेळगावचेच होते. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते संघाचे स्वयंसेवक होते. एम एस सी पदवी पूर्ण केल्यानंतर ते …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस 11 तर भाजप 7 जागांवर आघाडीवर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस 11 तर भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. अनेक मतदारसंघांचे निकाल यापूर्वीच जाहीर झाले असून काही मतांची मोजणी सुरू आहे. अथणी, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर, सौंदत्ती, कित्तूर, रामदुर्ग, कागवाड, चिक्कोडी, यमकनमरडी, बैलहोंगल आणि कुडची येथे काँग्रेसचा विजय निश्चित आहे. बेळगाव दक्षिण, खानापूर, …

Read More »

उद्या दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील : जिल्हाधिकारी

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी केंद्र असलेल्या टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयात जमा करण्यात आली असून उद्या शनिवारी दुपारपर्यंत सर्व मतदार संघाचे निकाल जाहीर होऊ शकतील, अशी शक्यता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बोलून दाखविली. आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये …

Read More »

ओळखपत्र उपलब्ध न झाल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित

  बेळगाव : भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला वयाच्या 18 वर्षानंतर मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिलेला आहे. तो हक्क बजावत असताना मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. कालच कर्नाटकात विधानसभा निवडणुका पार पडल्या. मात्र बरेच मतदार या निवडणूक ओळखपत्रापासून वंचित राहिलेले आहेत. नवीन मतदार ओळखपत्र किंवा मतदान ओळखपत्रावरील दुरुस्तीसाठी पुन्हा मागविण्यात …

Read More »

राजहंसगड येथील शिवाजी गल्लीत पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामपंचायत विकास अधिकारी धारेवर

  बेळगाव : राजहंसगड येथील शिवाजी गल्लीत मागील बारा दिवसापासून पाणी पुरवठा झाला नसल्याने आज ग्रामपंचायत विकास अधिकारी दुर्गाप्पा तहसीलदार यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. मुबलक प्रमाणात पाणीसाठा असूनही ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. गावातील इतर गल्ल्यांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित केला जातो, परंतु शिवाजी गल्लीमध्ये पाणीपुरवठा …

Read More »

आरपीडी कॉलेजमध्ये शनिवारी होणार मतमोजणी, संपूर्ण परिसर सीलबंद

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात एकूण 76.70% मतदान झाले असून सर्व ईव्हीएम आरपीडी कॉलेजमधील स्ट्राँगरुममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यासह बेळगाव जिल्ह्यात बुधवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान अखेर सुरळीत पार पडले. उन्हाच्या झळा सोसत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात …

Read More »