Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

म. ए. समिती सांगली शाखा पदसिद्ध अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी यांचा युवा समितीकडून सत्कार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका महापौर तसेच मागील काही महिन्यांपूर्वी सीमाभागातील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती तथा म. ए. समिती सांगली शाखा पदसिद्ध अध्यक्ष श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांचा सांगली भेटीवेळी सत्कार करण्यात आला. डिसेंबर महिण्यात म. ए. समितीच्या वतीने महावेळाव्याचे आयोजन …

Read More »

जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने विद्यार्थिनींसाठी आरोग्य मार्गदर्शन

बेळगाव : “आरोग्य हीच खरी धनसंपदा” शालेय वयातच मुलांना आरोग्याचे महत्व, आरोग्य विषयक समस्या व उपाय याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. सविता कद्दू, आय.एम.ए. अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ तसेच जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा …

Read More »

सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तडीपार करा

बेळगाव : चित्रदुर्ग पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्नाटक कर्मचारी संघ, ग्रामविकास आणि पंचायत तसेच कर्मचारी संघाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. चित्रदुर्ग जिल्ह्यातील चळकेरे तालुक्यातील कार्यकारी अधिकारी मडगीन बसाप्पा यांच्यावर दि. १४ फेब्रुवारी रोजी तालुका पंचायत कार्यालयात काहींनी अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करत हल्ला केला. या दुष्कर्म्यांना …

Read More »

म. ए. युवा समितीच्यावतीने पिरनवाडी येथील मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

बेळगाव : दि. १५/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत पिरनवाडी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रतिवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप …

Read More »

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे कुस्ती मैदान 27 फेब्रुवारी रोजी

बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने कुस्ती आखाडा रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी भरवण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे बेळगावच्या आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात येते. यावर्षी रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी भरवण्यात येणार होता पण राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यामुळे …

Read More »

रेल्वे स्थानकात डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची दलित संघटनांची मागणी

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांसोबत भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारण्यात यावा, अशी मागणी दलित संघटनांनी केली आहे. शहरातील विविध दलित संघटनांनी आज बुधवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर स्वातंत्र्यसेनानी संगोळ्ळी रायण्णा, राणी कित्तूर …

Read More »

न्यायालय इमारत, सुविधांसाठी विशेष अनुदान देण्याची आम. बेनके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन आणि न्यायालय आवार याठिकाणी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच न्यायालयीन इमारतींचे नूतनीकरण करून त्या सुसज्ज करण्यासाठी 2 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सादर करण्यात …

Read More »

आर. आर. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त युवा समितीच्यावतीने अभिवादन!

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त आज सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील अंजनी गावामधील महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या ‘निर्मळ स्थळ’ या स्मृतीस्थळी भेट देऊन आबांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले यावेळी आबांचे सुपुत्र व तासगावचे युवा नेते …

Read More »

हुंचेनहट्टी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात

बेळगाव : हुंचेनहट्टी (ता. जि. बेळगाव) येथील श्री संत सांप्रदायिक वारकरी एकता संघातर्फे या महिन्याअखेर आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा मुहूर्तमेढ कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. हुंचेनहट्टी येथील मराठी कन्नड प्राथमिक शाळेच्या मैदानावर येत्या दि. 26 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात …

Read More »

माध्यमिक विद्यालय कर्ले येथे पालक मेळावा संपन्न

बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय कर्ले ता. बेळगाव येथे दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी पालक, शिक्षक, विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किणये ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक रावजी पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर यांनी …

Read More »