Wednesday , April 22 2026
Breaking News

हत्तरगी येथील हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात गोकुळ अष्टमी उत्सव; गायक अजित कडकडेंची उपस्थिती

Spread the love

 

बेळगाव : हत्तरगी (यमकनमर्डी) ता. हुक्केरी जि. बेळगाव येथील हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात गोकुळ अष्टमी उत्सव बुधवार दि. ६ ते ९ सप्टेबर पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी यांनी “बेळगाव वार्ता” प्रतिनिधीशी बोलताना दिली.
बुधवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते मठाच्या महाद्वार कमाणिचे भूमिपूजन व श्री हरी नगर नामकरण सोहळा होणार आहे. यानंतर शाहूवाडी येथून येणाऱ्या दिंडीचे स्वागत, सायंकाळी ६ नंतर रजत कुलकर्णी (बेळगाव) यांचा गायनाचा व सौ. स्वरदा पटवर्धन (सांगली) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच याच दिवशी संगीत भजन स्पर्धा होणार आहेत. गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी रुद्राभिषेक व सायंकाळी ५ वाजता अभिषेक काळे (सांगली) व ६ वाजता सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहेत. यावेळी वेणूगोपाल गोसावी उपस्थित राहणार आहेत. रात्री कोल्हापूरच्या स्वामी समर्थ मंडळाचे सोंगी भजन होणार आहे. शुक्रवार दि. ८ रोजी गोपाळकाला व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आनंद उर्फ नृसिंह गोसावी यानी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *