बेळगाव : दिनांक 2 मे रोजी सकाळी बेळगाव उत्तर मतदारसंघातील विजयनगर, विनायक नगर, बुडा स्किन नंबर 51 या भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. श्री. अमर येळूरकर यांची प्रचार फेरी काढण्यात आली. मराठी बहुलभाग असणाऱ्या या भागातून नागरिकांनी अमर येळूरकर यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला भागातील अनेक घरांमध्ये येळूरकर यांचे …
Read More »राष्ट्रीय पक्षाचे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन कावळे होण्यापेक्षा समितीचे मावळे व्हा : माजी आमदार मनोहर किणेकर
हिंडलगा : राष्ट्रीय पक्षाचे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन कावळे होण्यापेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे मावळे व्हा, असा सल्ला माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला. काल म ए समितीचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांच्या हिंडलगा परिसरात झालेल्या प्रचार पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. मराठीच्या अस्तित्वासाठी येत्या दहा मे रोजी …
Read More »रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ विविध भागात होणार प्रचार
बेळगाव : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे. म. ए. समितीचे दक्षिण मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांचा येत्या तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणी जोरदार प्रचार करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. मंगळवारी मजगाव येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे. मंगळवारी व बुधवारी महाराष्ट्रातील विविध नेत्यांच्या …
Read More »‘मजदूर नवनिर्माण संघ’ आणि बेळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कामगार दिवस साजरा
बेळगाव : बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटना व ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने सोमवार दिनांक 1 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता उद्यमबाग (मजगांव) येथील जिल्हा कामगार कचेरीच्या आवारात महात्मा गांधीजींच्या फोटोचे पुजन करून मनरेगा व बांधकाम कामगारांच्या सोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. यासमयी असिस्टंट कमिशनर ए.बी. अन्सारी, …
Read More »कुडची भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा झंझावात
बेळगाव : 30 मे रोजी सायंकाळी कुडची भागांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांची प्रचार फेरी काढण्यात आली. गावातील महिला तसेच युवक वर्ग समितीनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने यांच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते. शेकडून नागरिकांच्या सहभागामुळे कुडची गाव समितीमय झाले होते. महिलांनी ठिकठिकाणी आरती ओवाळून ऍड. …
Read More »चाकूने भोसकून केली महिलेने तरुणाची हत्या
बेळगाव : क्षुल्लक कारणावरून महिलेने चाकूने भोसकून एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना बेळगावात घडली आहे. शहरातील जुन्या पीबी रोडवरील कीर्ती हॉटेलजवळ रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली असून नागराज भीमसी रागीपाटील (वय 28, रा. तारिहाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. दारूच्या नशेत चाकू घेऊन जाणाऱ्या महिलेची विचारपूस केल्यावर …
Read More »सर्वसामान्यांचा विचार करणाऱ्या माणसाला निवडून द्या
राष्ट्रवादीचे युवानेते आमदार रोहित पवार यांचे उद्गार बेळगाव : येणारी निवडणूक मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आणि निष्ठेची आहे. मराठी माणूस हा स्वाभिमान जपणारा आणि लढवय्या आहे. त्यामुळे निवडणुकीत विजय निश्चित आहे. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी विधिमंडळात आपला लोकप्रतिनिधी लागतो. त्यासाठी सर्वसामान्यांचा विचार करणाऱ्या माणसाला निवडून द्या, असे उद्गार …
Read More »सीमावासियांनी मतदानातून लोकेच्छा दाखवून द्यावी : रोहित पवार
बेळगाव : मराठी भाषा, महाराष्ट्र या एका विचाराने अनेक हुतात्म्यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. अजूनही त्या हुतात्म्यांचे स्वप्न साकार झालेले नाही. त्यामुळे हे स्वप्न साकार करण्यासाठी मराठी माणसाने लढा दिला पाहिजे. आपला प्रतिनिधी विधिमंडळात पाठवायला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उचगाव आणि बेळवटी या ठिकाणी …
Read More »उपनगरीय भागातून अमर यळ्ळूरकर यांना भरघोस पाठिंबा
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांची प्रचारामध्ये आघाडी दिसत आहे. शहरी भागातील उदंड प्रतिसादानंतर उत्तर मतदारसंघातील उपनगरीय भागामध्ये सुद्धा अमर यळ्ळूरकर यांना भरघोस पाठिंबा जनतेतून मिळत आहे. नेहरूनगर, अयोध्या नगर, सदाशिवनगर, जाधव नगर, हनुमान नगर आदी भागांमध्ये प्रचारादरम्यान मराठी लोकांनी अमर …
Read More »भगव्या ध्वजांवर प्रशासनाची वक्रदृष्टी; नागरिकांत तीव्र नाराजी
बेळगाव : निवडणूक आयोगाला मराठी भाषेसोबत भगव्यात ध्वजाचीही कावीळ झाल्याची प्रचिती शहापूर विभागात आली. शिवजयंती निमित्त शहापूर विभागात सर्वत्र भगव्या पताका व भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. घरांवर व सार्वजनिक ठिकाणांवर लावण्यात आलेले भगवे ध्वज हटविण्याची मोहीम निवडणूक अधिकाऱ्यांनी हाती घेतली. मात्र मराठी भाषिक तरुणांनी या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta