Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

म. ए. समिती आयोजित “शेतकरी मेळावा” उद्या; राजू शेट्टी यांची उपस्थिती

बेळगाव : 24 मार्च रोजी बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सरकार विविध कारणास्तव बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगुंदी येथील शेतकरी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. …

Read More »

रिक्षा चालकाच्या मुलीला एंजल फाउंडेशनचा मदतीचा हात

  बेळगाव : बेळगाव शहरातील कोनवाळ गली येथील एका रिक्षाचालकांच्या मुलीला शिक्षणासाठी हातभार लावत एंजल फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात देऊ केला आहे. एंजल फाउंडेशनच्यावतीने मीनाताई बेनके यांनी सदर मुलीची शाळेची फी भरून तिच्या पुढील शिक्षणासाठी मोलाचा हातभार लावला आहे. मुलांना शिक्षण घेता यावे, शिक्षण घेताना कोणालाही, कोणत्याही समस्या उद्भवू नयेत, …

Read More »

प्रगतिशीलमध्ये शुक्रवारी शहीद भगतसिंग यांच्यावर व्याख्यान

  बेळगांव : प्रगतिशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. 24 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांच्या स्मॄति दिनानिमित्त निवॄत्त शिक्षक सुभाष कंग्राळकर यांचे शहीद भगतसिंग यांच्यावर व्याख्यान होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे. गिरीश कॉम्प्लेक्स रामदेव गल्ली कार पार्किंग एरिया …

Read More »

कांगली गल्लीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

  बेळगाव : कांगली गल्लीतील एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमामुळे आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवानेच या घटनेत जीवितहानी टळली. बेळगावच्या मध्यवर्ती भागातील कांगली गल्लीतील ठाकूर कुटुंबियांच्या जुन्या राहत्या घराला आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटने …

Read More »

सुमारे 100 वर्ष जुन्या वृक्षाची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी

  बेळगाव : वॅक्सिन डेपो रोड टिळकवाडी रोड वरील ही घटना असून आज दि. 23 रोजी सकाळी फॉरेस्ट विभागाचे काही कर्मचारी या ठिकाणी बेकायदेशीर वृक्षतोड करत असल्याचे पर्यावरण प्रेमीच्या निदर्शनास आले त्यांनी त्वरित किरण जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली. कोणताही विलंब न करता जाधव घटनास्थळी …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे 26 मार्च रोजी वधू-वर मेळावा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 26 मार्च रोजी वार्षिक भव्य वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिज जवळील मराठा मंदिर येथे सकाळी 10.30 वा. हा मेळावा होणार आहे. यावेळी व्यावसायिक शीतल वेसणे हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात इच्छुक वधू व वर …

Read More »

येळ्ळूर येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आधुनिक विकास कामांना चालना

  बेळगाव : दिनांक 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येळ्ळूर येथे येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या पंधराव्या आयोगातून 2021-22 आणि 2022-23 अंतर्गत गावामध्ये ठिकठिकाणी हायमास्ट पथदीप आणि नामफलकाच्या उपक्रमाचे अनावरण तसेच सीसीटीव्ही सारख्या आधुनिक कामांना चालना देण्यात आली. तसेच अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गत गावातील शाळांमध्ये प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे अंगणवाडींना लहान …

Read More »

13 लाख रुपयांची अवैध रोकड जप्त

  बेळगाव : बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातील फोर्ट रोडवरील पिंपळकट्टा येथील तपासणी नाक्यावर एका दुचाकी वाहनातून तब्बल 13 लाखांची रोकड जप्त केली आहे. बुधवारी ही कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. निवडणुकीच्या …

Read More »

देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनरेगा कामगार दिल्लीला रवाना

    बेळगाव : मजदूर नवनिर्माण संघाच्या माध्यमातून बेळगांव, धारवाड व विजापूर जिल्ह्यातील मनरेगा कामगार दिल्लीला चाललेल्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले. कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमधून रोजगाराचे (मनरेगा) काम करणारे कामगार सहभागी होण्यासाठी जात आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून राजधानी दिल्लीमध्ये नरेगा संघर्ष मोर्चाद्वारे देशभरातील विविध राज्यांतील मनरेगा कामगारांच्या समस्यांबाबत …

Read More »

पिरनवाडी चेकपोस्ट : २.८९ लाखांची रोकड जप्त

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सप्तसूचनेनुसार प्रशासनाने बेकायदेशीर अवैध कारवाईन विरोधात धडक मोहीम चालविली आहे. या मोहिमेअंतर्गत येथील पिरनवाडी चेकपोस्टवर भरारी पथकाने आज बुधवारी 2.89 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चेकपोस्टवरून जाणाऱ्या इंडिका वाहनाला पोलिस आणि एफएसटीने अडवले. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता 2.89 …

Read More »