Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

जागतिक पर्यावरण दिनादिवशीच वृक्षतोड

बेळगाव : आज जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत आहे. पण स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील झाडांची कत्तल करण्यात येत आहे. बेळगावातील आंबेडकर रस्त्यावर जागतिक पर्यावरण दिनादिवशीच वृक्ष तोड होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Read More »

माणगाव फाटा येथे दुचाकी घसरून तुरमुरी येथील एकाचा मृत्यू

तेऊरवाडी (एस.के. पाटील) : माणगाव फाटा (ता. चंदगड) येथे दुचाकी घसरून रस्त्याशेजारी कापून ठेवलेल्या ओंडक्यावर आदळल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. संकेत शाम तंगणकर (वय ३१, रा. तुरमुरी, ता. बेळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ९.१० वाजता हा अपघात घडला. संकेत हा विजयनगर (बेळगाव) येथे पाळीव प्राण्याच्या खाद्याचे …

Read More »

परिवहनच्या विशेष बससेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

बेळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संक्रमित नागरिकांवर उपचार करण्यासाठी परिवहन मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. या अंतर्गत बस रूग्णवाहिका, महिला शौचालय आणि बालदेखभाल युनिटसह अत्याधुनिक यंत्रणायुक्त असलेल्या परिवहनच्या विशेष बससेवेचे आज मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. आज बेळगाव दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी फीत कापून अधिकृतरीत्या ही सेवा कार्यान्वित …

Read More »

आशादिप सोशल वेल्फेअरतर्फे येळ्ळूरमधील गरजूंना अन्नधान्याचे वाटप

येळ्ळूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना सदृश्य परिस्थिती त्यातच उद्योगधंदे बंद, इतर व्यवसायही बंद आहेत, शेतीमध्ये सुद्धा अपुरा रोजगार उपलब्ध असल्यामुळे अनेक गरजू आणि गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत अशादिप सोशल वेल्फेअर सोसायटीचे चेअरमन व अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्ज्वला कुगजी तसेच सदस्य परशराम …

Read More »

संसर्ग दर कमी करण्याची अधिकाऱ्यांना सूचना : मुख्यमंत्री

बेळगाव : कोरोना नियंत्रणात येत आहे. आणखी थोडे प्रयत्न केल्यास तो आणखी नियंत्रणात येईल याचा मला विश्वास आहे. काहीही करून पॉझिटिव्हिटी दर शेकडा ५ इतका कमी आला पाहिजे यासाठी जोर लावण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. अधिकारी याकडे लक्ष देत आहेत असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले. बेळगावातील सुवर्णसौधमध्ये कोविड …

Read More »

खानापूर- जांबोटी क्राॅसवरील खोकी धारकांना वाली कोण?

खानापूर (प्रतिनिधी) : जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील खोकी रस्त्याचे काम पुढे करून एक महिण्यात हटविली. हातावर पोट भरून घेणाऱ्या खोकीधारकाना उपाशी पोटी पाडवले. बघता बघता जांबोटी क्राॅसवर स्मशान शांतता पसरली. जवळपास १०० खोकी भूईसपाट झाली. होत्याचे नव्हते झाले. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी याकडे ढूंकुन ही पाहिले नाही. १०० …

Read More »

हलगा-मच्छे बायपास रद्द करा; मागणीसाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना निवेदन

बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पाश्वभूमीवर सुवर्ण सौध समोर हलगा मच्छे बायपास रद्द करा यासह अनेक मागण्या पूर्ण करा अश्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बेळगाव तालूका रयत संघटना अध्यक्ष राजू मरवे, भोमेश बिर्जे, तानाजी हलगेकर, प्रितेश होसूरकर यांनी ही सुवर्ण सौधसमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी …

Read More »

नंदगड पोलिस स्थानकाला नुतन पोलिस निरीक्षक

खानापूर : जंगलाने व्यापलेला खानापूर तालुका हा विस्ताराने सर्वात मोठा तालुका आहे. अशा खानापूर तालुक्याला एकच पोलिस निरीक्षक कार्यरत होते. तीन पोलिस उपनिरीक्षक काम करत होते.नुकताच कर्नाटक राज्यात पोलिस निरीक्षकाच्या जागा वाढविल्याने खानापूर तालुक्यातील नंदगड पोलिस स्टेशनमध्ये पुन्हा एका पोलिस निरीक्षकाची जागा वाढली. त्यामुळे खानापूर तालुक्याला दोन पोलिस निरीक्षक कार्यरत …

Read More »

बीम्सवर आयएएस प्रशासक नेमणार : मुख्यमंत्री येडियुराप्पा

बेळगाव : बेळगावच्या बीम्स संस्थेतील आणि इस्पितळातील गैरकारभाराबाबत चर्चा करण्यात आली आहे. येत्या ३–४ दिवसांत बीम्सवर समर्थ आयएएस अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली. मुख्यमंत्री येडियुराप्पा बेळगावातील सुवर्णसौधमध्ये आज कोविडसह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी …

Read More »

कर्नाटकातील बारावीची परीक्षा अखेर रद्द, तर दहावीची परीक्षा होणार

बेंगळुरू : राज्यात एसएसएलसी, पीयूसी बोर्ड परीक्षा २०२१ आयोजित करण्याचा अंतिम निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मंत्री शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर …

Read More »