नवी दिल्ली : स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सीमेवरील बेळगाव, निपाणीसह अनेक भाग हा मराठी भाषिकांचं प्राबल्य असणारा आहे. त्यामुळे हे भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी तेथील नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आज जवळपास पाच वर्षांनंतर बेळगावच्या मुद्द्यावर सर्वोच्च …
Read More »गणेशमूर्ती मिरवणूक मार्ग व विसर्जन तलावाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुचाकीवरून पाहणी!
बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज बेळगावात चक्क दुचाकीवरून फिरून गणेशमूर्ती मिरवणूक मार्ग व विसर्जन तलावाची पाहणी केली. गणेशोत्सवानिमित्त मिरवणूक निघणाऱ्या शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज सोमवारी चक्क दुचाकीवरून प्रवास केला. गणेशाची प्रतिष्ठापना व विसर्जन करताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी …
Read More »विवेकानंद सौहार्दची वार्षिक सभा खेळीमेळीत
बेळगाव : कॉलेज रोडवरील प्रथितयश संस्था विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑपरेटिव्ह सोसायटीची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. बुधवार दि. 24 रोजी लोकमान्य रंगमंदिरमध्ये ही सभा झाली. सोसायटीचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी सोसायटीच्या कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले, की संस्थेला या आर्थिक वर्षात 7 लाख 50 सजार रुपयांचा नफा झाला. …
Read More »मराठी कागदपत्रांसाठी बेळवट्टी ग्राम पंचायतीला निवेदन
बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये कन्नड बरोबर मराठी कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनानुसार तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत निवेदन देण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानुसार बेळवट्टी येथेही निवेदन देण्यात आले. युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, बेळवट्टी …
Read More »घुबडाला जीवदान!
बेळगाव : रात्रभर पतंगाच्या मांजात पंख अडकून पडलेल्या घुबडाची सुखरूप सुटका नागरिकांनी आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलने करून घुबडाला जीवदान दिले. शहापूर आचार्य गल्ली येथे एका घराच्या छप्परावर मांजात पंख अडकून जखमी झालेले घुबड पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी पाहिले. नंतर आचार्य गल्लीतील गोपी गलगली, नरेंद्र बाचीकर आणि विलास अध्यापक यांनी छप्परावर …
Read More »सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आज बैठक
बेळगाव : बेळगाव शहर व परिसरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आज सोमवार दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 6-00 वाजता सिद्ध भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर पाटील गल्ली (शनी मंदिर समोर) बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे. अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सरचिटणीस महादेव पाटील, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण – …
Read More »वडगाव येथील आनंदनगर, संभाजीनगर भागात गटारीचे पाणी घरात
बेळगाव : वडगाव येथील आनंदनगर, संभाजीनगर परिसरात गटारी नसल्यामुळे तसेच गटाराची सफाई केली नसल्यामुळे पावसाचे पाणी या परिसरातील घरामध्ये शिरले आहे. आनंदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी फोटो आणि व्हिडीओमार्फत येथील परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आनंदनगर, संभाजीनगर अन्नपूर्णेश्वरी नगर, केशवनगर आदी भागातील नागरिकांनी वेळोवेळी ही समस्या …
Read More »येळ्ळूर येथे चोरट्यांचा धुमाकूळ!
बेळगाव : येळ्ळूर येथे शनिवारी पहाटे सराफी दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली. गावकरी साखरझोपेत असतानाच चोरट्यांनी साखळी चोऱ्या करून धुडगूस घातला. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळ्ळूर गावातील परमेश्वर नगर येथील बालाजी ज्वेलर्स हे दुकान शनिवारी पहाटे दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी फोडले. 5 लाख 50 हजार रु. किंमतीचे आठ …
Read More »स्वकुळ साळी समाज राज्यस्तरीय महोत्सवात बेळगावच्या श्रेया सव्वाशेरीचा गौरव
बेळगाव : स्वकुळ साळी समाज (विणकर) कर्नाटक राज्य पातळीय स्वकूळ साळी सांस्कृतिक महोत्सव बेंगलोर येथे दि. 26 रोजी रवींद्र कलाक्षेत्र येथे संपन्न झाले. समाजातील राज्यभरातून विविध क्षेत्रांतील पंचवीस साधकांचे गौरव या ठिकाणी करण्यात आले. नृत्य, अभिनय, गायन, पोवाडा गायन, कीर्तनाच्या माध्यमातून मतदान जागृती, समाजसेवा, विविध क्षेत्रांमध्ये नवलौकिक मिळविलेल्या आपल्या …
Read More »“बेळगाव वार्ता”च्यावतीने आकर्षक गणेश मूर्ती स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : “बेळगांव वार्ता”तर्फे ‘आकर्षक गणेश मूर्ती’ तसेच ‘आकर्षक सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण तसेच खानापूर या चार विभागात घेतली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 5 सप्टेंबर ही अंतिम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta