चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.माजी सैनिक मलगौडा बसगौडा पाटील हे या अपघातात जागीच ठार झाले. ते मूळचे चिक्कोडी तालुक्यातील मुगळी गावचे आहेत. मयत मलगौडा पाटील हे त्यांचे नातेवाईक लक्ष्मी पाटील यांच्यासह …
Read More »माउंट अबू राष्ट्रीय पत्रकार संमेलनासाठी बेळगावातील पत्रकार रवाना
बेळगाव : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने दिनांक 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पत्रकार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी बेळगावातून पत्रकार आज शनिवारी रवाना झाले आहेत. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्षी अबू रोड शांतीवन येथे राष्ट्रीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात येत …
Read More »अमृत महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक व प्राईड सहेली यांच्यातर्फे विविध स्पर्धा
बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक यंदा आपले अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळ व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जायंट्स प्राईड सहेली यांच्या संयुक्त विद्यमानाने खालील स्पर्धा अयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमधील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षीस प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह दिली जातील अशी माहिती मंडळाचे …
Read More »मुरगोड पोलिसांकडून आंतरराज्य चोरट्याला अटक
मुरगोड : मुरगोड पोलीस स्टेशन हद्दीतील घर व खाजगी बँक चोरी प्रकरणी मुरगोड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 10 ग्रॅम सोने, 1.10 किलो चांदीची नाणी व रोख रक्कम असा एकूण 4 वेगवेगळ्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. मुरगोड पोलिसांनी यरगट्टी शहरातील किराणा दुकान, खाजगी बँक आणि बेनकट्टी गावातील …
Read More »हलगा येथे एकाचा निर्घृण खून
बेळगाव : हलगा (ता. बेळगाव) गावातील बस्तीजवळ हालगा -तारीहाळ रस्त्यावर सौंदत्ती तालुक्यातील एका इसमाचा अज्ञातांनी भररस्त्यात मानेवर वार करून खून केल्याची घटना सायंकाळी 4 च्या दरम्यान घडली. गदगय्या हिरेमठ (वय 40) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर प्रकारामुळे हालगा -तारीहाळ रस्त्यावरील संबंधित परिसरात एकच खळबळ उडवून घबराट निर्माण …
Read More »मराठीतून कागदपत्रे देण्यासंदर्भासाठी माजी नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार 15 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असल्यास त्यांना त्यांच्या भाषेत सरकारी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार बेळगांव शहरात 22 टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक राहतात. त्यांना सरकारी परिपत्रके मराठीतून द्यावीत त्याचप्रमाणे महानगरपालिकेवर मराठी बोर्ड लावण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी माजी महापौर …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मार्केटचे एसीपी म्हणून एन. व्ही बरमनी तर सायबर पोलीस स्थानक पोलीस निरीक्षकपदी बी. आर. गड्डेकर बेळगाव : बेळगावातील बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे. बेळगाव मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांची बदली गुन्हे विभागाचे एसीपी म्हणून तर गुन्हे विभागाचे एसीपी एन. व्ही. भरमणी यांची मार्केटच्या एसीपी म्हणून नियुक्ती …
Read More »बेळगावात राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना करा : बार असोसिएशनची मागणी
बेळगाव : राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी बेळगाव बार असोसिएशनने केली आहे. गुरुवारी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांच्या नेतृत्वाखाली बार असोसिएशनच्या सदस्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केले. बेळगावमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी कर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना …
Read More »गणेशोत्सव मंडळाना भाजप नेते किरण जाधव यांच्याकडून सावरकरांच्या प्रतिमेचे वाटप
बेळगाव : आजादी का अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिना दरम्यान राबविण्यात आलेल्या ” हर घर तिरंगा” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर आता गणेश चतुर्थी निमित्त प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्याचे अभियान हाती घेतले जाणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपचे कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस आणि विमल फाउंडेशन …
Read More »खिळेगाव पाणी योजनेच्या ऐनापुर जॅकवेलची आमदारांकडून पाहणी
डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची अधिकार्यांना सूचना अथणी : अथणी व कागवाड मतदार संघातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे हेच आपले स्वप्न आहे. डिसेंबरमध्ये खिळेगाव-बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणारच, असा विश्वास माजी मंत्री व आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला. खिळेगाव बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेच्या ऐनापूर येथील मुख्य जॅकवेलला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta