बेळगाव : बेळगाव येथील नेहरू स्टेडियमच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित माध्यमिक मुला-मुलींच्या उंचउडी, खो -खो, कबड्डी, भालाफेक, 4×100 मी. रिले स्पर्धेत डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलच्या स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केले आहे. माध्यमिक मुलांच्या उंचउडी, 100 मी, 200 मी, 4×100 मी. रिले स्पर्धेत शाळेचा मुस्तफा नाजूकन्नवर हा विजेता …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनीतर्फे मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर विज्ञान कथाकथन स्पर्धा व व्याख्यानमालेचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने बेळगाव सीमा भागातील तसेच चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी दिनांक 9 सप्टेंबर रोजी विज्ञान कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे व दिनांक 24 ते 26 सप्टेंबर यादरम्याने विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर यांच्या स्मरणार्थ ही …
Read More »आगीत होरपळून सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा दुर्दैवी मृत्यू
नार्वेकर गल्ली बेळगाव येथील घटना बेळगाव : नार्वेकर गल्ली बेळगाव येथे घरात लागलेल्या आगीत सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास लागलेल्या आगीत सुप्रिया बैलूर (वय 78) राहणार नार्वेकर गल्ली यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक धूर …
Read More »महाप्रसादाला फाटा देत बॅ. नाथ पै चौक मंडळाचा आगळावेगळा प्रसाद वाटपाचा उपक्रम
बेळगाव : रिमझिम पावसांच्या सरितही यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवा दरम्यान महाप्रसाद कार्यक्रमांनाही उधाण आले आहे. दरम्यान बॅ. नाथ पै चौक गणेशोत्सव मंडळांने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाप्रसादा ऐवजी प्रत्येक दिवशी एक वेगळ्या प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखा असा स्वादिष्ट प्रसाद वाटपाचा उपक्रम गणेश भक्तांमध्ये कौतुक …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये दिवंगत अनंत जाधव यांची आदरांजली सभा
बेळगाव : दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी मराठी विद्यानिकेतनचे सचिव, द.म.शि. मंडळाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, सीमा चळवळीतील कार्यकर्ते दिवंगत अनंत जाधव यांची आदरांजली सभा पार पडली. दिनांक १ सप्टेंबर रोजी अनंत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. अनंत जाधव हे मराठी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक सचिव होते. मराठी विद्यानिकेतन …
Read More »“बेळगावच्या राजा”ची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती
बेळगाव : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तीची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाआरती केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, गणेशोत्सव हा तरुणांसाठी आणि नागरिकांसाठी एकता, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे, असे सांगितले. त्यांनी सर्व नागरिकांना शांतता आणि सलोख्याने हा सण …
Read More »बेळगावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; अनोळखी हिंदू वृद्धेवर अंत्यसंस्कार
बेळगाव : बेळगावात हिंदू-मुस्लिम एकतेचा आदर्श दर्शवित माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातून अनोळखी हिंदू वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगावात माणुसकी आणि जातीय सलोख्याचा एक आदर्श प्रसंग समोर आला आहे. बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागील १० ते १५ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका अनोळखी हिंदू वृद्ध महिलेचे काल निधन झाले. …
Read More »अमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी शहापूर पोलिसांकडून एकाला अटक
बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. शहापूर पोलीस ठाण्याने बुधवारी समर्थ नगर येथे केलेल्या कारवाईत विनायक रामा चारटकर नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५.९८ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. पोलिसांनी आरोपीकडून …
Read More »श्रीमूर्ती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज : पोलीस आयुक्त भूषण बोरसे
बेळगाव : बेळगाव शहरात शनिवारी श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी, त्याचबरोबर श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पाडावी याबाबत संपूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, शनिवारी बेळगाव …
Read More »बेळगावात सकल मराठा समाजाचा आनंदोत्सव!
बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे पाच दिवसापासून उपोषणाला बसले होते. त्यांच्या या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल बेळगाव सकल मराठा समाजाच्यावतीने धर्मवीर संभाजी चौक येथे आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta