बेळगाव : शहरातील अत्यंत वर्दळीच्या गणपत गल्ली परिसरात शनिवारी सकाळी बेळगाव महापालिकेने अतिक्रमणाविरोधात पुन्हा एकदा जोरदार मोहीम राबवत रस्ते मोकळे केले. रहदारी पोलिसांच्या सहकार्याने पार पडलेल्या या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. गणपत गल्ली ही बेळगावच्या मुख्य बाजारपेठांपैकी एक महत्त्वाची व्यापारी गल्ली मानली जाते. दररोज हजारो नागरिक …
Read More »बेळगावात बांगलादेशी घुसखोरांच्या संशयावरून पोलिसांकडून २० हून अधिक जणांची चौकशी
बेळगाव : शहरात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर असल्याच्या संशयावरून बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत केंद्रीय बसस्थानकातून २० हून अधिक जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, हुबळी येथून तीन बसमधून काही संशयित व्यक्ती बेळगाव शहरात आल्याची माहिती मिळाली होती. याबाबत संशय व्यक्त झाल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आणि तातडीने …
Read More »जमीन वादातून दोन गटांत तुफान हाणामारी; महिलांसह ९ जण गंभीर जखमी
रायबाग : रायबाग तालुक्यातील निपनाळ येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत महिलांसह एकूण नऊ जण गंभीर जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, निपनाळ गावातील बिलकारा शेतातील जमिनीच्या वादातून हा संघर्ष उफाळून आला. एका गटाने शेत रिकामे …
Read More »भटक्या श्वानाच्या हल्ल्यात निपाणी साईशंकरनगर येथील मुलगा गंभीर जखमी
निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात भटक्या श्वानांचा दिवसेंदिवस उपद्रव वाढत आहे. तरीही पालिका प्रशासनाने कोणतीही उपायोजना केलेली नाही. येथील साईशंकर नगर मधील निहाल तुषार कांबळे (वय ११) मुलाचा भटक्या श्वानाने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तात्काळ येथील महात्मा गांधी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करून त्याला घरी पाठवण्यात …
Read More »सहकारी पतसंस्थांच्या कार्यात लोकविश्वास महत्त्वाचा : युवराज हुलजी यांचे प्रतिपादन
बेळगाव : सर्वसामान्य गोरगरीब जनता सहकारी पतसंस्थांमध्ये आपली जमापुंजी ठेवत असते. संस्थेत गोरगरिबांचा पैसा असतो. सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून गोरगरीब गरजूंना मोलाची मदतही होते. अशावेळी सहकारी पतसंस्थांच्या कार्यात लोकविश्वास महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन, बेळगाव क्रेडाईचे चेअरमन युवराज हुलजी यांनी बोलताना केले. भारत नगर येथील वेदांत मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभागृहात शनिवारी पार …
Read More »क्रूझरला ट्रकची धडक : एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू
कलबुर्गी : क्रूझर आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर अपघात कलबुर्गी जिल्हा येथील चित्तापूर तालुक्यातील लाडलापूर क्रॉसजवळ, राष्ट्रीय महामार्ग १५० वर घडला. ट्रकच्या जोरदार धडकेमुळे क्रूझर वाहनाचा चक्काचूर झाला. या अपघातात तोलूसाब कॅश्वार (27), हुसेन शहा (48), …
Read More »शिवानंद निलण्णावरांकडून कार गिफ्ट घेतलेल्या करवे जिल्हाध्यक्षाला सीआयडी नोटीस
बेळगाव : अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सीआयडी ताब्यात असलेल्या शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलण्णावर यांच्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. करवे (प्रवीण शेट्टी गट) बेळगाव जिल्हाध्यक्ष अभिलाष यांना सीआयडी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. शिवानंद निलण्णावर यांनी अभिलाष यांना …
Read More »नवोदित कवी डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांना “कबीर कोहिनूर राष्ट्रीय सन्मान” जाहीर
बेळगाव : जिल्ह्यातील बेळंकी गावचे रहिवासी तसेच नवोदित कवी डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांना प्रतिष्ठेचा “कबीर कोहिनूर राष्ट्रीय सन्मान” जाहीर झाला आहे. राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील बड़ी खाटू येथे अखिल भारतीय कबीर मठ यांच्या वतीने २९ जून रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात संस्थेचे प्रमुख संत संत श्री नानकदासजी महाराज यांच्या …
Read More »बेळगाव शहर, तालुका व औद्योगिक वसाहतीत उद्या रविवारी वीजपुरवठा दिवसभर खंडित
बेळगाव : हेस्कॉम देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने रविवारी (दि. २४) शहर, औद्योगिक वसाहतींसह बेळगाव तालुक्यातील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खंडीत करण्यात येणार आहे. शहरात शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कार रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, कडोलकर गल्ली, हंस …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये अटल टिंकरिंग विज्ञान शिबिर संपन्न
बेळगाव : दिनांक 22 मे 2026 रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे अटल टिंकरिंग लॅबच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिराचा सांगता समारंभ पार पडला. दरवर्षी सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येतात. यावर्षी ही शिबिराचे आयोजन 12 मे पासून 22 मे पर्यंत करण्यात आले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta