Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

पोलीस निरीक्षकांना सुवर्णपदक प्रदान

बेंगळुरू : गेल्या 2021 सालातील कर्तव्यदक्ष प्रामाणिक सेवेबद्दल हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांना आज शनिवारी मुख्यमंत्री सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. उगादी अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बेंगलोर येथे आज सकाळी मुख्यमंत्री सुवर्णपदक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते …

Read More »

भाजपा ग्रामीणच्यावतीने बसुर्ते मराठी प्राथमिक शाळेला ग्रीन बोर्ड वितरण

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने बसुर्ते येथे सरकारी मराठी प्राथमिक शाळेला 4ु10 फुटाचे 7 ग्रीन बोर्ड वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपा ग्रामीण मंडळाच्या वतीने 60 गावांतील 400 वर्ग खोल्यांना ग्रीन बोर्ड देण्याचा संकल्प करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. विधानपरिषद सदस्य …

Read More »

बेळगाव आयुक्तालयात 10172 कोटी रुपये जीएसटी संकलन

बेळगाव : केंद्रीय जीएसटी बेळगाव आयुक्तालयाने 2021-22 या आर्थिक वर्षात 10172 कोटी रुपये इतके विक्रमी जीएसटी संकलन केले आहे अशी माहिती बेळगावचे जीएसटी उप आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी दिली आहे. एका प्रसिद्धी पत्रकात जीएसटी उप आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी म्हटले आहे की, इतके विक्रमी जीएसटी कर संकलन हे …

Read More »

बायपास रस्त्यावरील कचऱ्याची शेतकरी रविवारी विल्हेवाट करणार!

बेळगाव : हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या व अन्य जे गैरप्रकार चालतात त्याला आळा घालण्याच्या मागणीकडे प्रशासन व पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी या बायपास पट्ट्यातील शेतकरी एकत्र येऊन येत्या रविवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी श्रमदानाने या रस्त्याशेजारील शेतात पडलेल्या दारूच्या बाटल्या व इतर कचरा गोळा करणार आहेत. …

Read More »

बेळगावात १३० कोटीतून होणार किडवाई कॅन्सर हॉस्पिटल

बेळगाव : बेळगावात ४ एकर प्रशस्त जागेत १३० कोटी रुपये खर्चातून किडवाई कॅन्सर संस्था हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बंगळूरच्या किडवाई संस्थेचे संचालक डॉ. सी. रामचंद्र यांनी सांगितले. बेळगावात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सी. रामचंद्र म्हणाले, शिमोगा, तुमकूर, म्हैसूर येथे किडवाई संस्थेची केंद्रे सुरु करण्यात आली …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे ३ एप्रिल रोजी वधू-वर मेळावा

बेळगाव – मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि.३ एप्रिल रोजी वधू -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता या मेळाव्यास प्रारंभ होईल. या मेळाव्यास सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पाटील व युवा उद्योजक शीतल वेसणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तरी मेळाव्याचा अधिकाधिक …

Read More »

44.16 कोटींची घरपट्टी बेळगाव मनपाकडून वसूल

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाला यंदाच्या आर्थिक वर्षात उद्दिष्टाच्या 80 टक्के पेक्षा जास्त घरपट्टी वसुली करण्यात यश आले असून तब्बल 44 कोटी 16 लाख रुपये इतकी घरपट्टी वसूल करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वाधिक घरपट्टी वसुली आहे. कोरोना लॉकडाऊनची समस्या गेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात देखील होती. याशिवाय बेळगाव …

Read More »

जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या विशेष समिती सदस्यपदी मोहन कारेकर यांची निवड

बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या छत्तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे संस्थापक सदस्य मोहन कारेकर यांची जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या जागतिक स्थरावर काम करणाऱ्या संघटनेच्या विशेष समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. गेल्या छत्तीस वर्षापासून जायंट्स मेनचे सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून कार्य केले असून …

Read More »

रेल्वे स्थानकासमोर छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवा : प्रमोद मुतालिक

बेळगाव : पुनर्निर्मित नव्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर बसविण्यात आलेल्या महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या प्रतिमांमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अभाव आहे ही अत्यंत दुर्दैवी व खेदाची बाब आहे. तेव्हा केंद्र सरकारने बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमानमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचा अंतर्भाव करावा, अशी मागणी श्रीराम सेनेचे …

Read More »

धर्मवीर संभाजी महाराज चौकात बलिदान मासाची सांगता

बेळगाव : वद्य श्रीशके 1610 दिनांक 11 मार्च 1689 हौतात्मा दिन तेंव्हापासून प्रत्येक वर्षी एक महिना बलिदान मास म्हणून पाळला जातो. या महिन्यामध्ये शंभुभक्त पायात चप्पल न घालता व आपले आवडते अन्न वर्ज करुन दररोज सकाळ व सायंकाळी फोटोपूजन करतात. या बलिदान मासाला एक महिना झाला असून शिवपुत्र छत्रपती श्री …

Read More »