Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

पंतवाड्यात पंत जन्माष्टमी मोठा उत्साहात साजरी

  बेळगाव : समादेवी गल्लीतील श्री पंतवाडा येथे शनिवारी पंत जन्माष्टमी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी पहाटे श्री पंत घराण्याचे वंशज परमपूज्य रंजन पंत परमपूज्य राजन संजीव पंत, रोहन पंत, श्रीवत्स कुलकर्णी यांच्या हस्ते पंत जन्मोत्सवाची पूजा करण्यात आली. सकाळच्या सत्रात सकाळी पारंपरिक भजन, यमुनाक्का महिला मंडळाचे …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षिका शीतल बडमंजी यांच्या स्मरणार्थ विज्ञान कथाकथन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ

  बेळगाव : शीतल बडमंजी यांच्या स्मरणार्थ विज्ञान कथाकथन स्पर्धा दिनांक ३० जुलै २०२५ रोजी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची मूल्ये जपावीत हाच या स्पर्धेचा मूळ उद्देश होता.शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, ॲड. राजाभाऊ पाटील,शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, वि.गो.साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, …

Read More »

शॉपिंग उत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

  बेळगाव : “शाॕपिंग उत्सव सारखी प्रदर्शने यश इव्हेंट व कम्युनिकेशन्सनी आयोजित केल्याने बेळगावकरांना नवनव्या वस्तू व उपकरणे एकाच ठिकाणी पहायला व माफक दरात खरेदी करायला मिळतात तसेच स्टॉल धारकांना आपल्या व्यवसायातील विविध उत्पादनांची मांडणी करून ग्राहकां पर्यंत पोहोचता येते” असे मत उद्घाटक रोटरी क्लब बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी …

Read More »

सीमाप्रश्नी उच्चाधिकारी समितीची तातडीने बैठक घ्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे समिती शिष्टमंडळाची मागणी

  बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीला महिनाभरात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सीमा प्रश्नासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे सीमा समन्वयक मंत्री, उच्चाधिकार समिती, तज्ञ कमिटी त्याचप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबई मुक्कामी बोलवावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज …

Read More »

बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग!

  बेळगाव : बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. बेळगावच्या सांबरा विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेतलेले स्टार एअरचे विमान तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर पुन्हा सांबरा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने विमान १५ मिनिटे हवेतच उडवले आणि लँडिंग केले. सुदैवाने, …

Read More »

‘बेळगावचा राजा’चा आगमन सोहळा उत्साहात साजरा; बाप्पाला बघण्यासाठी हजारो बेळगावकर रस्त्यावर

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील डोळे दीपतील बेळगावच्या राजाचं सुंदर रूप पाहायला मिळालं. दरवर्षी गणेशोत्सवात ‘बेळगावचा राजा’चं दर्शन घेण्यासाठी बेळगावच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर ग्रामीण भागातील भाविक आगमन सोहळ्याला धर्मवीर संभाजीराजे चौकात येत असतात. शुक्रवारी रात्री 11 वाजता धर्मवीर संभाजीराजे चौकात 18 फूट उंचीच्या ‘बेळगावचा राजा’चे दिमाखात आगमन होताच राजाचे आगमन …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

  स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्हा आघाडीवर होता : पालकमंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक लढाईतून भारतीयांना मिळालेल्या स्वातंत्र्याने जगाच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. त्याने जगात लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया रचला आहे. स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्ह्याची भूमिका कमी नाही. देशाला अतुलनीय सेनानी, खरे देशभक्त आणि स्वाभिमानी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित प्रकल्प लवकरच सुरू होणार; पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : बेळगावकर जनतेचा बहुप्रतिक्षित उड्डाणपूल प्रकल्प, नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आणि पत्रकार भवनाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढील महिन्यात उद्घाटन करतील, असे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बेळगाव जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव शहरातील जिल्हा क्रीडांगणावर पार पडलेल्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, पाटबंधारे …

Read More »

बेळगाव शहर परिसरातील अनधिकृत ब्युटी पार्लर, रुग्णालये, क्लिनिक, स्किन केअर सेंटरवर छापेमारी

  बेळगाव : नियमांचे उल्लंघन केलेल्या बेळगाव शहर परिसरातील शहरातील अनेक अनधिकृत ब्युटी पार्लर, स्किन केअर सेंटर आणि रुग्णालयांवर आरोग्य विभागाने आज मोठी छापेमारी केली. शुक्रवारी (15 ऑगस्ट) बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या निर्देशानुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वर गदादी यांनी ही कारवाई केली, ज्यामध्ये 30 अनधिकृत रुग्णालये, क्लिनिक आणि …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कलखांब येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण

  बेळगाव : कलखांब येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. माजी एसडीएमसी अध्यक्ष भरमा पाटील यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी आदी …

Read More »