लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक आहे. मात्र, गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच आहे. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमका कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. तरी, कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी, …
Read More »श्रीराम सेनेतर्फे राबविण्यात आले डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबीर
बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थान यांच्यावतीने व डॉ. सोनाली सरनोबत यांच्या सहयोगाने आज आनंद नगर, वडगाव येथे डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्री शिव मंदिर विश्वस्त मंडळ, आनंद नगर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा परिसरातील जवळपास एक हजार लोकांनी लाभ घेतला. संघटनेचे …
Read More »बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा.. : खासदार संजय राऊत
मातृभाषेतून शिक्षण हा सर्वांचा नैसर्गिक आणि न्याय हक्क : संमेलनाध्यक्ष श्रीराम पचिंद्रे बेळगाव : “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र हा झाला पाहिजे यासाठी हुतात्मे दिलेले आहेत, तिथल्या व्यक्तीला जेव्हा काठी बसते त्याचा वळ आम्हाला जाणवतो. सीमाभागात मराठी संस्कृती नांदते आहे. सीमाभागात शैक्षणिक व साहित्य संमेलनातून भाषा संस्कृतीचे संवर्धन केले जात आहे. यासाठी …
Read More »आमदारांनी जमा केलेल्या कचऱ्याचा ट्रॅक्टर खाली केला आयुक्तांच्या घरासमोर …!
बेळगाव : बेळगाव शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढिगारे पाहून नागरिकांतून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी शहराच्या स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे करीत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना सकाळपासूनच समर्थकांसह जागोजागचा कचरा जमा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला आणि तो थेट विश्वेश्वरनगर …
Read More »‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’
कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …
Read More »नैसर्गिक नाले शोधून अतिक्रमणे हटवा; शेतकरी संघटनेची मागणी
बेळगाव : महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीनंतर निर्माण होणारी पूर परिस्थिती आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा शोध घ्यावा. त्यावरील अतिक्रमण दूर करून शहरात साचणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शहराचे आमदार अनिल बेनके यांच्याकडे केली आहे. बेळगाव आणि उपनगरात महानगरपालिका हद्दीमधील बराच मोठा भाग हा बळळारी नाला काठी …
Read More »सीमाभागात आज पहिले मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृतीला संजीवनी मिळावी व नवोदित कवी, लेखकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखा आयोजित सीमाभागातील पहिले अखिल भारतीय ऑनलाईन साहित्य संमेलन रविवार दि.२५ रोजी दोन सत्रात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्ष असून उदघाटक म्हणून दैनिक …
Read More »रियल इस्टेट उद्योजकाचे अपहरण झाल्याने खळबळ
बेळगावातील घटनाबेळगाव : रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका उद्योजकाचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची घटना शहरात उघडकीस आल्यामुळे उद्योजकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.नामांकित रियल इस्टेट व्यवसायिक व उद्योजक मदनकुमार भैरप्पनावर यांचे अपहरण झाल्याची घटना आज सकाळी माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे.बेळगाव शहराच्या कणबर्गी रस्त्यावरील श्रुती अपार्टमेंटनजीक महाराष्ट्र पासिंगच्या कार गाडीतून आलेल्या …
Read More »पावसाचा जोर ओसरला, पुरपरिस्थिती जैसे थे
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर रुग्ण घेऊन जात असताना पुराच्या पाण्यात अडकलेली चारचाकी गाडी. (छायाचित्र: अनिल पाटील, कोगनोळी) राष्ट्रीय महामार्ग बंद : अनेक कुटुंबांचे स्थलांतरकोगनोळी : परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरामध्ये असणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा नदीचे पाणी …
Read More »संत मीरा शाळेत टिळक जयंती साजरी
बेळगांव : अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत टिळक जयंती साजरी करण्यात आली.प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी दप्तरदार यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याची माहिती व त्यांच्या तत्त्वांचे शालेय शिक्षकांनी प्रेरणा कशी घ्यावी याची माहिती दिली. याप्रसंगी चंद्रकांत तुर्केवाडी, विनीता देशपांडे, मीनाक्षी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta