बेळगाव: आमदार अनिल बेनके यांनी गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि मंजुनाथ पम्मार यांनी जिल्हा गृहरक्षक दलाच्या कार्यालयाला भेट देऊन फेस मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले. लॉकडाऊन काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महामारी विरुद्ध जिल्ह्यामधील बंदोबस्तामध्ये कार्य केलेल्या गृहरक्षक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी …
Read More »भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्यावतीने वृक्षारोपण
बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगाव ग्रामीण मंडळमध्ये दहा हजार वृक्षारोपण कार्यक्रमाला मंडळ कार्यालय विजय नगर हिंडलगा येथे प्रारंभ करण्यात आला. ह्या प्रसंगी बोलताना जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पाटील म्हणाले, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. कोरोना काळामध्ये ऑकक्सिजनचे महत्व लोकांच्या लक्षात आले …
Read More »बाल शिवाजी वाचनालय मच्छे येथे छत्रपती श्री शाहू महाराज जयंती साजरी
बेळगाव : दि. २६ राेजी सायंकाळी ८ वाजता मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयामध्ये लोकराजा छत्रपती श्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मारुती बेळगावकर यांनी केले. शाहीर मेघा धामणेकर हीने पाेवाडा सादर केला. ढाेलकीवर साथ सिध्दांत धामणेकर याने दिली.बजरंग धामणेकर व विनायक चाैगुले यांनी …
Read More »कापोली शिवठाण ते कोडगई रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी यासाठी सोमवारी आंदोलन
खानापूर : गेल्या अनेक महिन्यापासून खराब झालेल्या कापोली शिवठाण ते कोडगई रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक २८ जून २०२१ रोजी सकाळी १०.३० खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शिवठाण येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.कापोली ते …
Read More »खानापूर बेळगाव हद्दीवरून गर्लगुंजी- राजहंसगड क्राॅस रस्त्याची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव खानापूर हद्दीवरून गर्लगुंजी ते राजहंसगड क्राॅस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासून ते बेळगाव तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकर आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पूर्ण केले. परंतु बेळगांव हद्दीतील राजहंसगड क्राॅस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.दोन तालुक्याच्या मधील रस्त्याची दुरावस्था झाल्याने केवळ अर्धाकिलोमिटर अंतर …
Read More »जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन साजरा
बेळगाव : बेळगाव रेल्वे पोलीस ठाणे, बेळगाव रेल्वे उप ठाणे आणि रेल्वे सुरक्षा दल बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. मादक पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, मादक पदार्थ सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल माहिती देणारी पत्रके रेल्वे प्रवाशांमध्ये वितरीत केली. तसेच …
Read More »चर्मकार समाजातील गरजूंना प्रोत्साह फौंडेशनच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण
बेळगाव : बेळगावमधील गरजू आणि गरीब चर्मकार समाजबांधवाना प्रोत्साह फौंडेशनच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले. प्रोत्साह फौंडेशनचे प्रमुख जीएसटी उपायुक्त चंद्रकांत लोकरे, पदाधिकारी बीएसएनएलचे डेप्युटी सर व्यवस्थापक मल्लीकार्जुन ताळीकोटी, थोर सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांच्या उपस्थितीत किटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी समाजाचे युवा नेते संतोष होंगल, प्रजा नेरळुचे संपादक …
Read More »विविध मागण्यांसाठी एलआयसी एजंटाचे धरणे आंदोलन
बेळगाव : कोरोना काळात मृत्यू पावलेल्या एलआयसी एजंटांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जावी, त्याशिवाय या काळातील एलआयसी प्रीमियमवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये तसेच ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाचे व्याजदर रिझर्व्ह बँकप्रमाणे कमी करावे अशा विविध मागण्यांसाठी एलआयसी एजंट फेडरेशनतर्फे 16 ते 30 जून या काळात देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलेले …
Read More »निलजीत राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण
बेळगाव : निलजी विभाग महाराष्ट्र एकिकरण युवा समिती व निलजी ग्रामस्थांच्यावतीने राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.आज शनिवार दिनांक 26 जून 2021 रोजी निलजी विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व निलजी ग्रामस्थांच्यावतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.निलजी गावचे प्रतिष्ठित …
Read More »झोपडपट्टीत साजरी केली छत्रपती शाहू महाराज जयंती
बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील आर्टिस्ट आकाश हलगेकर व मित्र परिवारातर्फे शनिवारी लोकराजा राजश्री शाहू छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त कणबर्गी बेळगाव येथील सागर नगर येथील झोपडपट्टीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झोपडपट्टीतील रहिवाशांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta