Sunday , September 8 2024
Breaking News

आजरा

चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाची वंचितासोबत दिवाळी साजरी

  गुरुजींनी जपली सामाजिक बांधिलकी चंदगड : दिवाळी म्हणजे अंधार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण. असाच आनंद चंदगड मराठी अध्यापक संघाच्या वतीने पाटणे फाटा येथील भंगार गोळा करणाऱ्या समाजासोबत वाटला आहे. गरीबीच्या पसाऱ्यात त्यांचा जन्म झाला आणि यातच त्यांच्या आयुष्याच्या वाटा निसरट्या झाल्या. आपल्यासाठी कोणीतरी गोड …

Read More »

अबब! महागाव येथे १,८८,६०० रूपयांच्या बनावट नोटासह तिघांना अटक, गडहिंग्लज पोलिसांची कारवाई

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महागाव (ता. गडहिंग्लज) गावच्या हद्दीत पाच रस्ता चौक येथे पोलिसांनी कारवाई करून बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघाना बनावट नोटासह ताब्यात घेतल्याने गडहिंग्लज विभागात खळबळ उडाली आहे. महागावातील पाच रस्ता चौकात दोन इसम बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली …

Read More »

बुगटे आलूर परिसरातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

गडहिंग्लज : बुगटे आलूर पंचक्रोशीतील विद्यार्थी गडहिंग्लज येथे शालेय व कॉलेज चे विद्यार्थी बहुसंख्येने गडहिंग्लज येथे शिक्षणासाठी जात असतात. यासाठी निपाणी वरून गडहिंग्लजसाठी एकच बस दिवसातून फेऱ्या मारत असते. सदर बस निपाणी डेपोची असून सकाळी 10:30 ला गडहिंग्लजला जाणारी बस कॉलेज व शालेय विद्यार्थ्यांना अपुरी पडत असून दरवाज्यात लटकून प्रवास …

Read More »

चंदगड एसटी आगाराचा चंदगड तालुक्यातील प्रवाशांना त्रास; आगाराच्या २६ फेऱ्या रद्द

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालूक्यातील एसटी महामंळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऐन गणेशोत्सव काळात महामंडळाच्या नावाने शिमगा करण्याची वेळ येणार आहे. चार – पाच नव्हे तर तब्बल २५ एस.टी. बसगाड्या गणेशोत्सव कालावधीत पूणे -मुंबईला धावणार आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील १० दिवस रोजच्या २६ बस फेऱ्या रद्द …

Read More »

कोल्हापूर येथे उद्योजक, व्यापारी यांच्या बैठकीत ‘हलाल’सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना!

कोल्हापूर – ‘हलाल’ ही इस्लामिक संकल्पना ‘सेक्युलर’ म्हणवणार्‍या भारतातील बहुसंख्य 78 टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खाजगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून हजारो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत. मूळ …

Read More »

तरूण भारतच्या “त्या” चूकीच्या बातमीमुळे चंदगड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; सोशल मिडीयावर पत्रकाराचा खरपूस समाचार

  चंदगड (एस. के. पाटील) : तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या चंदगडला घड्याळाच्या काट्याची बदलणार दिशा? या बातमीचे तीव्र पडसाद चंदगड विधानसभा मतदारसंघात उमटले. आज दिवसभर या चूकीच्या वृत्ताबद्दल संबंधीत पत्रकाराचा फोन व सोशल मिडीयावरून सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व आमदार राजेश पाटील समर्थकांनी उद्धार केल्याचे समजते. चंदगडचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील …

Read More »

कोल्हापूरचं ठरलं, हसन मुश्रीफ-संजय मंडलिकांमध्ये रंगणार लोकसभेची कुस्ती?

  कोल्हापूर : हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी ज्या आमदारांच्या मदतीने प्रा. संजय मंडलिकांनी शिवसेनेच्या तिकीटावर कोल्हापूर लोकसभेचे मैदान सहजपणे मारले, त्याच मंडलिकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र मुश्रीफांच्या विरोधात शड्डू ठोकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. या कुस्तीत खासदार धनंजय महाडिक हे प्रचाराचे भाजपचे प्रचार प्रमुख असणार हे विशेष. शिंदे …

Read More »

आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच

  आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी हत्तीने गवसे गावात उभ्या असलेल्या शेड, एक टेम्पो आणि दोन दुचाकींचे नुकसान केले. मुसळधार पावसामुळे आजरा-आंबोली मार्गावरील वाहतूकही सुमारे दोन तास खोळंबली. टस्कर बाजूला होईपर्यंत गोवा, आंबोली येथून येणारी वाहने अडकून पडली होती. दोन दिवसांपूर्वी टस्कराने शेतकरी महादेव …

Read More »

पूरग्रस्त शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज भरणार्‍या पूरग्रस्त शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या लाभातून वगळले होते. परंतु, या शेतकर्‍यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला. या शेतकर्‍यांना योजनेतून वगळले जाणार नाही, याबाबत शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश देत असल्याचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयातून केले आहे. खासदार धैर्यशील माने आणि प्रकाश आबिटकर यांनी ही …

Read More »

अलाबादेवी येथे दाव्याचा गळफास लागल्याने बैलांचा मृत्यू

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अलाबादेवी (ता. चंदगड) या गावातील मेहनती शेतकरी सुरेश कृष्णा घोळसे यांच्यावर ऐन शेतीकामाच्या हंगामात मोठं संकट कोसळल. सुरेश यांच्या गोठ्यामध्ये बांधलेली बैलजोड दावे एकमेकांमध्ये अडकल्याने फास लागून मरण पावली. शेतकऱ्याचा आधार असणारे बैल मृत्यूमूखी पडलेला हा प्रसंग पाहताना पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत. तर ज्यांची …

Read More »