उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांची माहिती कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची सन 2023-24 या चालू गळीत हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरक्कमी एफआरपी रू. 3100/- (तीन हजार शंभर) जाहीर करणे येत आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे …
Read More »‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज 2023″ हा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर
५ नोव्हेंबर रोजी दिला जाणार हा पहिलाच मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार कागल (प्रतिनिधी) : मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील “हेमलकसा” सारख्या दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक गरज म्हणून गेली 50 वर्षे आदिवासी जनतेला आणि वंचित व उपेक्षित घटकांना अखंडित सामाजिक सेवा देणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांना यावर्षीच नव्याने सुरू केलेला …
Read More »1 नोव्हेंबरच्या मूक मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हजारो शिवसैनिक सहभागी होणार
कोल्हापूर : एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. त्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकांवर अन्याय झालेला आहे. गेल्या 67 वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत …
Read More »राजू शेट्टींच्या ‘आक्रोश’ यात्रेचा धसका, कोल्हापुरात चार साखर कारखान्यांकडून ऊसाला विनाकपात दर देण्याची घोषणा!
कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या ऊस हंगामातील चारशे रुपये दिल्याशिवाय चालू हंगामात ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही असा गर्भित इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आक्रोश पदयात्रेचा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चांगला धसका घेतल्याचे दिसत आहे. राजू शेट्टी यांनी उसाच्या कांडाला हात …
Read More »शववाहिकेचा गुटख्याच्या अवैध वाहतूकीसाठी वापर
कागलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस : ४ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव- पंचताराकित एमआयडीसी रोडवर संशयितरित्या शववाहिका आढळून आली. शववाहिकेची तपासणी केली असता यात अवैधरीत्या गुटखा वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. या शववाहिकेवर कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा, पान मसाला …
Read More »राजे बँकेच्या सभासदांच्या खात्यावर १५% लाभांश जमा
अध्यक्ष एम. पी. पाटील यांची माहिती कागल (प्रतिनिधी) : येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील नफ्यातुन १५% लाभांश जाहीर केला होता. ती सभासदांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली. शतकमोहत्सवी वर्षात २५% व दरवर्षी प्रमाणे सतत १५% लाभांश देणारी राजे …
Read More »मार्व्हलस मेटल्सच्या कामगारांना न्याय मिळवून देऊ : समरजीतसिंह घाटगे
कामगारांनी निवेदनातून मांडली कैफियत कागल (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील “मार्व्हलस मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड” ही कंपनी सुरू करण्यासाठी लवकरच कंपनीच्या व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचे भाजपाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. बंद पडलेली कंपनी लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी कंपनीच्या कामगारांनी …
Read More »शिक्षकांनो…… शाळा ही मंदिरे आहेत संघटितपणे काम करा…! : शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे आवाहन
नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात कागल (प्रतिनिधी) : शिक्षकानो शाळा ही ज्ञानाची पवित्र मंदिरे आहेत. संघटितपणे काम करा आणि ज्ञानाधिष्ठित पिढ्या निर्माण करा, असे आवाहन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनचे सर्वच उपक्रम समाजोपयोगी आणि विधायक आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी …
Read More »काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
शेतीसह गावांना पिण्याचे पाणी आणि कोल्हापूर शहरालाही मिळणार स्वच्छ व मुबलक पाणी कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या हरितक्रांतीची वरदायिनी असलेले काळम्मावाडी धरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अस्मिता जणू. या धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये निधी मंजूर झाला …
Read More »हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने २२ रोजी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
कागलमध्ये खास समारंभात होणार पुरस्कार वितरण कागल (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन व कागल तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलच्यावतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे वितरण 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता मटकरी …
Read More »