कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमानी कारभारात विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाटमधील नियोजित सेवा संस्थेला अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला नियमानुसार देता येत नाही, असे केडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी सांगितल्यानंतर आक्रमक …
Read More »स्वतःच्या चितेची तयारी करुन वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःच्या चितेची तयारी करुन एका वृद्ध दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आजारपणास कंटाळून दाम्पत्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊस उचललं आहे. महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत. …
Read More »कोल्हापूर येथे जुगार अड्ड्यावरील छाप्यावेळी तिसर्या मजल्यावरून उडी; एकाचा मृत्यू
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडताच कारवाईच्या भीतीपोटी तरुणांनी तिसर्या मजल्यावरून उडी टाकली. यामध्ये साहिल मायकल मिणेकर-रजपूत (वय 26) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य तिघे जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमींना सुरुवातीला सीपीआर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यावेळी परिसरातील …
Read More »कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचणीचा पुन्हा पर्दाफाश; गर्भलिंग निदानासाठी 15 हजार घेताना रंगेहाथ कारवाई
कोल्हापूर : कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचण्यांचा उच्छाद सुरुच आहे. आज शहरातील राजारामपुरी परिसरातील श्री हाॅस्पिटलवर मनपाच्या आरोग्य विभागाने छापा टाकून 15 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पाच महिन्यांपूर्वी मोठे रॅकेट कोल्हापूर पोलिसांनी गर्भ निदान चाचणीचे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यानंतर मनपा हद्दीत आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. …
Read More »आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला कागलमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या
शहरात व्यवहार सुरळीत, चौकाचौकात बंदोबस्त तैनात कागल : कोल्हापूरला जातीय तणावाचा बट्टा लागलेला असतानाच कागलमध्ये एकाने आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कागलमध्ये चौकाचौकात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात शांतता असून …
Read More »कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर
कोल्हापूर : औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. बुधवारी दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. गुरुवारी सकाळी शहरात सगळीकडे शांतता होती. शहरातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त असून शहरात गस्त सुरु आहे. बुधवारी …
Read More »कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात; हिंसक जमावाला पांगवताना पोलिस यंत्रणेची पुरती दमछाक
लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे आज (7 जून) हिंदुत्ववादी संघटनेला पुकारलेला बंद आणि केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मंगळवारी (6 जून) दुपारी आक्षेपार्ह स्टेट्स आणि कोल्हापूर शहरात व्हायरल मेसेजवरुन परिस्थितीचा अंदाज असतानाही पोलीस यंत्रणेला हिंसक जमावाला पांगवण्यासाठी तब्बल अडीच तास …
Read More »कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे दूरसंचार कंपन्यांना आदेश; आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने प्रशासनाचा निर्णय
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये काल दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रुप धारण केलं आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर रस्त्यावर पळापळ आणि चपलांचा ढीग …
Read More »कोल्हापुरात ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण, कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी थेट रस्त्यावर
परिस्थितीवर तातडीने नियंत्रण आणण्याचे गृहखात्याचे निर्देश कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (7 जून) रस्त्यावर उतरल्या आहेत. संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृहविभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याला …
Read More »आक्षेपार्ह स्टेट्सप्रकरणी उद्या कोल्हापूर शहर बंदची हाक
कोल्हापूर : एका तरूणाने जातीय तेढ निर्माण करणारा स्टेटस लावल्याने कोल्हापुरात आज (दि.६) तणावपूर्ण वातावरण बनले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील दसरा …
Read More »