मुंबई : ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले आहे. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार स्विकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने ते आजारी होते. त्यांच्या निधनाने मराठीतील थोर साहित्यिक आणि पक्षीतज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. सोलापूर येथील …
Read More »गॅस गिझरच्या गळतीमुळे नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू; आजरा येथील हृदयद्रावक घटना
आजरा : बुरुडे (ता. आजरा) येथील भावेश्वरी कॉलनीत गॅस गिझरच्या गळतीमुळे नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सागर सुरेश करमळकर (वय ३२ ) व त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर (२६, दोघेही रा. मूळ गाव शिवाजीनगर आजरा) यांचा मृत्यू झाला आहे. सागरचा विवाह २० मे रोजी झाला आहे. …
Read More »राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या मूर्तीला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
मालवण : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या चबुतऱ्याच्या बाजूची काही माती खचली आहे. सततच्या पावसामुळे नव्याने करण्यात आलेल्या जमिनीचा भराव खचल्यामुळे ही घटना घडली आहे. यामुळे मूर्तीस कोणताही धोका नसून सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली आहे. नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी …
Read More »इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; ६ जणांचा अंत, अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
मावळ ( पिंपरी चिंचवड): रविवार सुट्टीचा दिवस, पर्यटकांसाठी घातवार ठरला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळल्याने ६ जणांचा अंत झाला असून वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभरापासून चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे …
Read More »मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन १५ दिवसांत सुरु होणार!
कोल्हापूर : लवकरच मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या ट्रेनची मागणी करण्यात आली होती, या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता लवकरच या मार्गावर वंदे …
Read More »धर्मांतरासाठी ७ महिन्यांच्या गर्भवतीचा छळ; महिलेची आत्महत्या…
सांगली : सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून सांगलीमध्ये एका ७ महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पतीसह सासू-सासरे या तिघांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत कुपवाडा येथील ७ महिन्यांच्या गर्भवती …
Read More »पुष्पक एक्सप्रेसमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू, रेल्वे रुळावर रक्त आणि मृतदेह
मुंबई : पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडलील आहे. ज्यामुळे रेल्वे रुळावर रक्त आणि मृतदेह पसरल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी ८:२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून निघालेल्या या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. …
Read More »साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!
पुणे : ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाऊंडेशनला मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष …
Read More »शिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजरा
शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, जिवंत देखाव्यातून शिवरायांच्या जीवनपटाला उजाळा कोल्हापूर (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच 6 जून 1674, शिवराज्याभिषेक दिन. या शुभ दिनाचे औचित्य साधून शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी जिल्हा परिषद आवारातील कागलकर वाड्याच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते उभारण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta