Thursday , November 21 2024
Breaking News

खानापूर

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ खानापूर तालुका डॉक्टर संघटनेच्या वतीने मोर्चाद्वारे निवेदन सादर

  खानापूर : कोलकाता येथील आर जी. कार वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरच्या हत्येप्रकरणी खानापूर तालुका डॉक्टर संघटनेच्या वतीने मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले. नुकताच कोलकाता येथील निवासी महिला डॉक्टरची अत्याचार करून अमानुष हत्या करण्यात आली या निषेधार्थ खानापूर तालुका डॉक्टर संघटनेने शनिवार दि.17 ऑगस्ट रोजी खानापूर शहरातून निषेध …

Read More »

प्रभुनगर येथील विद्यार्थ्यांनी केले बससाठी आंदोलन

  खानापूर : प्रभूनगर येथील विद्यार्थ्यांना बेळगाव येथील शाळा कॉलेजला जाण्यासाठी आज शनिवार दि. 17 ऑगस्ट रोजी, सकाळपासून एकही बस थांबत नसल्याने आंदोलनात्मक भूमिका घेतली. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व बस विद्यार्थ्यांनी अडविल्याने बेळगावकडे जाणाऱ्या अनेक बस काही काळ थांबून होत्या. त्यामुळे बराच गोंधळ उडाला. शेवटी केएसआरटीसीचे खानापूर डेपो मॅनेजर संतोष …

Read More »

खानापूरातील गावे स्थलांतर संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत तीन ठराव मंजूर!

  खानापूर : भीमगड अभयारण्यात असलेल्या 9 गावांचे स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या संदर्भात नऊ गावातील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व या विषयावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक राजा श्री शिवछत्रपती शिवस्मारक येथे बोलाविली …

Read More »

मलप्रभा नदीत उडी मारून एकाची आत्महत्या

  खानापूर : खानापूर तालुक्यातील बिडी गावातील एकाने मलप्रभा नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जिवाजी वसंत बिडकर (वय 65) हे त्यांचे नाव आहे. या व्यक्तीने बुधवारी दि.14 रोजी सायंकाळी खानापूर मलप्रभा नदीच्या पुलावरील जॅकवेल नजीक नदीत उडी टाकुन आत्महत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खिशातील आधार कार्ड नदी …

Read More »

नंजिनकोडल-दोड्डेबैल संपर्क रस्त्याला भगदाड; रहदारी ठप्प

  खानापूर : नंजिनकोडल-दोड्डेबैल संपर्क रस्ता खचल्याने या मार्गावरील रहदारी ठप्प झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी शेतवडीतील मोरीच्या पुलाला भगदाड पडले होते. ग्राम पंचायतीने मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती केली होती. पण, मंगळवारी (दि. १३) आज बाजूपट्ट्यांसह रस्ताच खचल्याने दोन्ही गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे. डांबरीकरणानंतर अवघ्या दोनच महिन्यात दोन ठिकाणी …

Read More »

वाढदिवसाचे औचित्य साधून केली रस्त्याची डागडूजी!

  खानापूर : अनेक जण वाढदिवसाचे औचित्य साधून पार्टी करण्यासह इतर कार्यक्रमाचे आयोजन करतात मात्र हलगा येथील ग्राम पंचायतीचे सदस्य रणजीत पाटील यांनी वाहन चालक आणि विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन रविवारी रस्त्याच्या डागडूजीचे काम हाती घेतले त्यामुळे या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून हलशी ते …

Read More »

खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आज शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी खानापूर तालुक्यातील जांबोटी सीआरसी, बैलूर सीआरसी व कणकुंबी सीआरसीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण वडगाव (जांबोटी) प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी हे …

Read More »

तळेवाडी ग्रामस्थांचे होणार स्थलांतर : जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

  बेळगाव : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य कार्यक्षेत्रात राहणाऱ्या तळेवाडी ग्रामस्थांच्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. भीमगड परिसरात अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अभयारण्य सोडू इच्छिणाऱ्या कुटुंबांचे शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन दिले. अभयारण्यात राहणाऱ्या लोकांना रस्ता, पाणी, वीज …

Read More »

कुप्पटगिरी- खानापूर रस्त्यावरील पूलाची श्रमदानातून डागडुजी

  खानापूर : कुप्पटगिरी- खानापूर रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या दगडी पूलाची ग्रामस्थांनी श्रमदानातून आज डागडूजी केली. सदर पूलाला भगदाड पडले होते व वाहतुक करणे धोक्याचे ठरत होते. कुप्पटगिरी रस्त्यावरील हा पूल उंचीला कमी असल्याने दर वर्षी पावसाळ्यात नाल्याचे पाणी पुलावरून वाहत जाते व त्याकाळात पूलावरून रहदारी बंद होते. तशात हा पूल …

Read More »

डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड येथे पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बारावी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि …

Read More »