खानापूर : कर्नाटक राज्य लेक्चरर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका सरकारी व अनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाची एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण बैठक नुकतीच खानापूर येथे अत्यंत उत्साहात पार पडली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या बैठकीत अत्यंत उत्सुकतावर्धक, खेळीमेळीच्या आणि एकोप्याच्या वातावरणात असोसिएशनच्या आगामी वर्षाच्या नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड …
Read More »क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला पुन्हा उधाण; डॉ. अंजली निंबाळकरांकडून आ. विठ्ठल हलगेकरांवर निशाणा
बेळगाव : विधान परिषद निवडणुकीतील कथित क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला नव्याने उधाण आले असून, खानापूरच्या माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांचे उपरोधिक शब्दांत आभार मानले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बेळगाव दौऱ्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. निंबाळकर …
Read More »गृहलक्ष्मी लाभार्थी महिलांनी कागदपत्रांसाठी खानापूरला येऊ नये; गावातील अंगणवाडी केंद्रातच कागदपत्रे जमा करा
पंच हमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांचे आवाहन खानापूर : तालुक्यातील गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी महिलांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी खानापूर येथील सीडीपीओ कार्यालयात येऊ नये. लाभार्थ्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा शिक्षिकांकडेच कागदपत्रे जमा करावीत. सीडीपीओ कार्यालयात ही कागदपत्रे स्वीकारली जाणार नसल्याने महिलांनी विनाकारण हेलपाटे घालू नयेत, असे …
Read More »एसआयआर प्रक्रियेत मराठी व समितीप्रेमी मतदारांनी आपले घर हाच आपला बूथ गाव, गल्ली हाच वॉर्ड म्हणून कार्यरत राहावे
धनंजय पाटील यांचे खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला आवाहन निवडणूक आयोगाने चालू केलेल्या एसआयआर (मतदार फेर निरीक्षण प्रक्रिया) अंतर्गत मतदारांची नावे नव्याने समाविष्ट करणे व बोगस किंवा मृत व्यक्तींची नावे वगळणे यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून पडताळणी सुरू आहे. राष्ट्रीय पक्षाच्या बूथ एजंटांना यापूर्वी यांचे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती …
Read More »खानापूरात विजेचा लपंडाव कायम; विकासकामांवरही प्रश्नचिन्ह
‘जनता त्रस्त… लोकप्रतिनिधी मस्त’ म्हणत काँग्रेसची सत्ताधाऱ्यांवर टीका खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. वीजपुरवठा, रखडलेली विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि सिंचन प्रकल्पांचा रखडलेला प्रश्न …
Read More »संततधार पावसाचा कहर; हब्बनहट्टीचे मारुती मंदिर पाण्याखाली
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील मलप्रभा नदीसह म्हादई, मंगोत्री, काळी, पांढरी आणि मार्कंडेय नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त …
Read More »खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर; मलप्रभा नदी दुथडी भरून वाहू लागली
खानापूर : तालुक्यातील कणकुंबी, जांबोटीसह पश्चिम घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम मलप्रभा नदीच्या पाणीपातळीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. नदीच्या उगमस्थानी पावसाचा जोर कायम असल्याने मलप्रभा नदी वेगाने प्रवाहित होत असून, पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या …
Read More »खानापूरात मुसळधार पावसाचा फटका; झाड कोसळून जामगाव दोन दिवसांपासून अंधारात
बेळगाव : खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जामगाव परिसराला बसला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठे झाड कोसळून वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, जामगावसह परिसरातील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे खंडित झाला असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत …
Read More »मोहिशेत गाव आजही चिखलाच्या विळख्यात; ग्रामस्थांचा संताप
खानापूर : राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेले मोहिशेत हे गाव आजही मूलभूत रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. 1994 पासून ग्रामपंचायत कार्यालय अस्तित्वात असूनही या गावाच्या रस्त्याकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम असून सध्या संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे आणि …
Read More »डॉक्टर दिनानिमित्त इंजिनिअर-समाजसेवक प्रसाद पाटील यांचा केएलई संस्थेकडून गौरव
खानापूर : डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक योगदान दिल्याबद्दल गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे सदस्य व व्यवसायाने इंजिनिअर असलेले प्रसाद विठ्ठल पाटील यांचा केएलईच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. डॉक्टर नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या प्रसाद पाटील यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला. प्रसाद पाटील हे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta