“चंदनापरी देह झिजविला, कष्टातून संसार फुलविला… शून्यातून विश्व उभे केले, पण स्वतःसाठी जगणे मात्र विसरलात…” दिनांक ४ जुलै २०२५ रोजी आम्हा सर्वांना कायमचे पोरके करून जाणारे माझे थोरले बंधू कै. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. पांडुरंग यांचा जन्म १० मार्च १९७० रोजी तिवोली …
Read More »चोर्ला मार्गावरील बससेवेच्या निवेदनाची दखल; दहा दिवसांत नवीन बस सुरू करण्याचे आश्वासन
गुंजी येथे बस थांब्यासाठी निवेदन खानापूर : बेळगाव बसस्थानक ते चोर्ला नवीन बससेवा सुरू करावी तसेच या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी सरकारी हमी योजना अंमलबजावणी समिती, खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सूर्यकांत के. कुलकर्णी यांनी एनडब्ल्यूकेएसआरटीसीच्या बेळगाव विभागीय नियंत्रकांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल हमी योजनेच्या …
Read More »डॉक्टर्स डे निमित्त खानापूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा सत्कार
खानापूर : राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनतर्फे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल व हार देऊन सन्मानित केले. यावेळी तालुक्यात आरोग्य …
Read More »स्व. मारुती दळवी : कर्तृत्व, संस्कार आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास
“गेलात आम्हा सोडून, राहिल्या मागे आठवणी… आठवणी मनी, स्मरणी; मार्गक्रमू या जीवनी…” माणूस जातो, पण त्याचे विचार, संस्कार, कर्तृत्व आणि माणुसकीची ऊब कायम स्मरणात राहते. आमच्या दळवी कुटुंबाचा भक्कम आधारवड, मणतुर्गे पंचक्रोशीतील सर्वपरिचित व आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि माझे लाडके काका, स्वर्गीय मारुती नारायणराव दळवी यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने आमच्या …
Read More »खानापूरातील धबधबे, जंगल परिसर पर्यटकांसाठी तात्पुरते बंद; वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय
खानापूर : खानापूर तालुका आणि पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे, नदी-नाले आणि जंगल परिसर अत्यंत धोकादायक बनले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वन विभागाने खानापूर तालुक्यातील सर्व प्रमुख धबधबे आणि वनक्षेत्रांमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी लागू केली आहे. बेळगावचे उपअरण्यसंरक्षणाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती …
Read More »गोवा (अनमोड) महामार्गावरील वरकडा गावाजवळ चिखलात बस अडकली; स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा
खानापूर : बेळगाव – गोवा (अनमोड) महामार्गावरील वरकडा (ता. खानापूर) गावाजवळ गुरुवारी सकाळी एनडब्ल्यूकेआरटीसीची बस चिखलात अडकल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, तर महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मुसळधार पावसामुळे वरकडा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून रस्त्याची दयनीय …
Read More »आरोग्य भारती बेळगाव व खानापूर शाखेतर्फे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त ज्येष्ठ वैद्यकीय सेवकांचा गौरव
खानापूर : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आज आरोग्य भारती बेळगाव व खानापूर शाखेतर्फे खानापूर, हलशी, बीडी व परिसरात १९८०–९० च्या दशकातील दुर्गम भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध नसलेल्या काळात एम.बी.बी.एस. पदवी संपादन करून आपल्या मातृभूमीत गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ निःस्वार्थ भावनेने वैद्यकीय सेवा करणारे वैद्यकीय त्रिरत्न डॉ. सुधीर नाईक, डॉ. …
Read More »मराठीत जनगणना फॉर्म उपलब्ध करा; तोपर्यंत विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया स्थगित करा
महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील खानापूर विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना फॉर्म तातडीने उपलब्ध करून द्यावेत. तसेच मराठीतील फॉर्म उपलब्ध होईपर्यंत ही प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती, खानापूर तालुक्याच्या वतीने …
Read More »खानापूरमध्ये पाच दिवस पाणीपुरवठा बंद; टाक्यांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे
खानापूर : खानापूर नगरपंचायतीमार्फत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठा टाक्यांची स्वच्छता तसेच आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवार, दि. 2 जुलै ते सोमवार, दि. 6 जुलै 2026 या कालावधीत शहरातील नियमित पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी दिली. या कालावधीत नागरिकांनी पिण्यासाठी …
Read More »सुर्ल (सुरल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला
बेळगावच्या रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांना यश; मुसळधार पावसामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी खानापूर : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुर्ल (सुरल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी (29 जून) अखेर शोधून बाहेर काढण्यात आला. मुसळधार पाऊस, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली होती. अखेर बेळगावच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta