खानापूर : गोवा राज्यातील सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायत हद्दीतील सुरल (सुर्ल) येथील, खानापूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या धबधब्यात बेळगावातील २० वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. २८) घडली. बुडालेल्या तरुणाचे नाव आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) असे असून तो मित्रांसह पिकनिकसाठी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, धबधब्यात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा …
Read More »पुण्यातील यशस्वी उद्योजक शिवानंद चन्नेवाडकर यांचा खानापूर तालुक्यातील तरुणांना आदर्शपाठ
माता-पित्यांच्या स्मरणार्थ गर्बेनहट्टीतील गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅगचे वाटप खानापूर : आजच्या काळात जेव्हा राजकारणी मंडळी निवडणूक, पद, प्रतिष्ठा आणि मानपान डोक्यात ठेवून तात्पुरते, दिखाऊ सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात, अशा काळात कोणतीही प्रसिद्धीची हाव न ठेवता, केवळ आपल्या जन्मभूमीप्रती असलेली कृतज्ञता आणि आई-वडिलांचे संस्कार जपणारी माणसे विरळीच असतात. पुण्यातील …
Read More »स्मार्टफोनच्या जगात पालकांचे आत्मपरीक्षण; ‘ताराराणी’त मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौतुकास्पद पाऊल!
खानापूर : खानापूर येथील मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात २४ जून २०२६ रोजी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा केवळ एक उपचार न ठरता, पालकांना अंतर्मुख करायला लावणारा एक अनोखा आणि अनुकरणीय सोहळा ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. अरविंद पाटील हे होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि …
Read More »काळाच्या पाऊलखुणा: म. मं. ताराराणी कॉलेजमध्ये ई-निवडणुकीचा ‘डिजिटल पॅटर्न’ विद्यार्थिनींनी अनुभवली लोकशाहीची आधुनिक ताकद!
खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक उत्साहपूर्ण आणि लोकशाही वातावरणात दि. १९ जून रोजी पार पडली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळावा यासाठी ‘EVM Simulator App’ चा वापर करण्यात आला. या निवडणुकीची संपूर्ण तयारी प्रा. जयश्री शिवटनकर मॅडम यांच्या …
Read More »चापगाव जल जीवन मिशन कामांबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; चौकशीची मागणी
खानापूर : चापगाव ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवन मिशन (JJM) अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये अनेक त्रुटी आणि अपूर्णता असल्याचा आरोप करत माजी पंचायत अध्यक्ष रमेश मल्हारी धबाले व ग्रामस्थांनी तालुका पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या या योजनेवर मोठ्या …
Read More »शिवाजीनगर अपघातातील जखमी सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती दळवी यांचे निधन; मणतुर्गा येथे आज अंत्यसंस्कार
खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय ६८) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, मंगळवार (दि. २३ जून २०२६) रोजी रात्री ८ वाजता मूळ गावी मणतुर्गा (ता. खानापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी …
Read More »खानापूर शिवाजीनगरात दोन दुचाकींची भीषण धडक; सेवानिवृत्त पोस्टमास्तर गंभीर जखमी
खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात सोमवारी (दि. २२ जून २०२६) दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय ६८, रा. मणतुर्गा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. …
Read More »मणतुर्गा–गावठाण रस्त्याचा मार्ग मोकळा; प्रशासन, शेतकरी आणि काँग्रेसच्या चर्चेतून सामंजस्याने तोडगा
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव यांच्या सूचनेनुसार मणतुर्गा गाव ते गावठाण रस्ता प्रकरणाला अखेर सकारात्मक वळण मिळाले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रशासन, शेतकरी आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. आज दुपारी १२ वाजता तहसीलदार, सर्वे विभागाचे अधिकारी, पीडीओ, काँग्रेसचे पदाधिकारी, पत्रकार तसेच …
Read More »स्वत:च्या अपंगत्वालाच बलस्थानी ठेऊन परशराम गुरव बनले बस्तवाडच्या पंचक्रोशीतील पहिला वकील!
खानापूर : बस्तवाड तालुका खानापूर येथील प्रशांत उर्फ परशराम हे क्लास टू शासकीय अधिकारी नोकरीत राहून अभ्यासाची कास घट्ट धरून रत्नागिरी येथील कायदा महाविद्यालच्या नुकताच जाहीर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कायदा परीक्षेत उत्तम गुणवतेसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून बस्तवाड, करजगी, मेरडा, हलगा, किरहलशी, जांभेगाळी, देवराई या पंचक्रोशीतील पहिले वकील …
Read More »“माझ्या पराभवामागे संगनमत होते का?” – माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल
बेंगळुरू / खानापूर : कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीतील कथित क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला आता नवे वळण मिळाले असून, खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “माझ्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामागे संगनमत होते का? मला राजकीय बळीचा बकरा बनवण्यात आले का?” असा थेट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta