Monday , June 1 2026
Breaking News

रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या अभद्र युतीसंदर्भात खानापूर काँग्रेस ब्लॉकतर्फे तहसिलदारांना निवेदन

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसतर्फे आज रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या अभद्र युती संदर्भात खानापूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन दिल्यानंतर खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी म्हणाले की, तालुक्यातील जनतेने विचारवंत, शिक्षक, शिक्षित उच्चशिक्षित, वारकरी, समाजप्रबोधनकार यांना प्रबोधन करण्यासाठी बोलवावे ना की रौडीशिटर ना. समाज म्हणून आपण वावरताना कोणाला प्रबोधनासाठी आपल्या गावात बोलविले पाहिजे याचा पण तालुक्यातील जनतेने विचार केला पाहिजे. तालुक्याचे तहसिलदार हे दंडाधिकारी आहेत आणि त्यांनी कमीत कमी रौडी शिटरचे तरी ग्लोरीफीकेशन होता कामा नये याची तालुका दंडाधिकारी म्हणून दक्षता घेतली पाहिजे.

सध्या तालुक्यात रौडीशिटर व पोलीस यांची अभद्र युती झाली असल्याचे दिसून येत आहे. कमीत कमी पोलीस प्रशासनास हे कळाले पाहिजे की आपण कोणाचे ग्लोरीफाकेशन करतोय असे महांतेश राऊत म्हणाले.

लक्ष्मण मादार म्हणाले, पोलीस प्रशासन जे काय करतयं ते अतिशय चुकीचे असून बाबासाहेबांचे संविधान पायदळी तुडविण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे असा घणाघात केला.

सध्या तालुक्यात रौडीशिटरचे उदो उदो करण्यात समाज गुंग झाल्याचे विचित्र चित्र दिसून येत आहे. समाजात अनेक विचारवंत, बुद्धीजीवी लोक असताना कोणी एका रौडीशिटरला ऐकत बसतात, हे समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा तालुक्यातील जनतेने व विचारवंतांनी, वारकरी मंडळींनी, बिद्धीजीवी माणसांनी विचार करण्याची वेळ आली आहे …

कोणत्याही परिस्थितीत खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस रौडीशिटर व पोलीस यांची अभद्र युती लोकशाही मार्गाने मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. जे जे यासंदर्भात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे, अशी मागणी गृहमंत्री यांचेकडे केली जाईल व पाठपुरावा केला जाईल.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती म. ए. समिती जो आदेश देईल त्याला खानापूर तालुका म. ए. समितीचा पाठिंबा

Spread the love खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकडे समितीची बैठक खानापूर म. ए. समितीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *