Sunday , September 20 2026
Breaking News

महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांसाठी 12 मे रोजी मतदान

Spread the love

 

मुंबई : निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राजकीय गणित स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार भाजपला 5 जागा, शिवसेनेला 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आणि महाविकास आघाडीच्या इतर घटकांना 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मर्यादित राहिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, अधिक उमेदवार मैदानात उतरल्यास चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून हालचालींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज आणि राजकीय रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *