Monday , June 1 2026
Breaking News

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love

 

कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहतर्फे श्री छत्रपती शिवाजीनगर फ्रेंड सर्कल यांच्या संयोजनाखाली म्युनिसिपल मैदानावर आयोजित ‘अरिहंत चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मांगले (जि.सांगली) येथील संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला सहकाररत्न उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते २ लाखाचे रोख बक्षीस आणि चषक देण्यात आले. तर कोल्हापूर या संघाने उपविजेते पदाचे १ लाखाचे रोख बक्षीस व चषक पटकावले. तर नारायणवाडी व हिंडलगा या संघाना विभागून तृतीय क्रमांकाचे ५० हजाराचे बक्षीस मिळवले.
स्पर्धे मधील सेमी फायनल सामना मांगले विरुद्ध नारायणवाडी, कोल्हापूर आणि हिंडलगा या संघात झाला.त्यामध्ये मांगले संघाने ६ षटकात १३५ तर नारायणवाडी संघाने ६ ओव्हरमध्ये ५५ धावा काढल्या. दुसऱ्या उपांत्य सामन्यात हिंडलगा या संघाने ६ ओव्हरमध्ये ९० धावा काढल्या. ही धावसंख्या गाठताना कोल्हापूर संघाने ५ ओव्हर ४ बाॅलमध्ये ९१ धावा काढल्या. त्यामुळे मांगले व कोल्हापूर या संघानी अंतिम फेरीत धडक मारली. मांगले येथील संघाने अंतिम सामन्यात ६ षटकात ७७ धावा काढल्या. यामध्ये प्रत्युत्तरादाखल खेळताना कोल्हापूर संघाला ६ षटकात ७० धावा काढता आल्या. त्यामुळे अखेर मांगले संघाने अरिहंत चषकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेत बेस्ट बॉलर म्हणून तनिष्क, बेस्ट बॅट्समन म्हणून नितीन माटुंगे, मॅन ऑफ दी मॅच म्हणून प्रथमेश राठोड तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून असिफ शेख यांना अनुक्रमे सायकल, मोबाईल व फ्रिज देऊन गौरविण्यात आले. सहकारत्न उत्तम पाटील म्हणाले,निपाणी परिसरातील खेळातील गुणवत्तेला चालना मिळावी त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा, म्हणून अरिहंत उद्योग समूह सातत्याने अनेक प्रकारच्या सांघिक तसेच वैयक्तिक खेळाच्या स्पर्धा भरवीत आहेत.त्यामुळे शहरासह ग्रामीण खेळाडूंनी याचा उपयोग करून घ्यावा त्यांच्या पाठीशी अरिहंत उद्योग समूह कायमस्वरूपी असल्याचे सांगितले.
त्यावेळीमाजी आमदार प्रा.सुभाष जोशी, डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, युवा उद्योजक अभिनंदन पाटील, प्रसन्नकुमार गुजर, शशिकांत खोत, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, ॲड.संजय शिंत्रे, प्रशांत नाईक, माजी नगरसेवक शेरू बडेघर, रवींद्र शिंदे, शौकत मणेर, दिलीप पठाडे, संतोष माने, निरंजन पाटील, युवा उद्योजक इम्रान मकानदार, गजानन कावडकर, महेश पाटील, रघुनाथ चौगुले, विनायक वडे, , शिरीष कमते, यांच्यासह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. चंदू मोरे यांनी सामन्याचे समालोचन केले.

About Belgaum Varta

Check Also

शाळा प्रारंभोत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम; उद्या होणार शाळांना प्रारंभ

Spread the love  पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी आवश्यक निपाणी (वार्ता) : शैक्षणिक वर्षाला गुरुवारपासून (ता. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *