Sunday , September 20 2026
Breaking News

योगेश गौडा खून प्रकरणी माजी मंत्री विनय कुलकर्णी दोषी

Spread the love

 

लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचा निर्णय

बंगळूर : भाजपचे नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्यासह इतर आरोपींना दोषी ठरवण्याचा आदेश येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिला आहे.

या प्रकरणाची सविस्तर सुनावणी केल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी हा निकाल जाहीर केला. शिक्षेचे प्रमाण उद्या (ता. १६) जाहीर करण्यात येणार असून, पुढील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. आदेशाची अधिकृत प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, सर्व आरोपींनी संगनमत करून (क्रिमिनल कट रचून) खून केल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले असून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

योगेश गौडा यांची १५ जून २०१६ रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याचा आरोप होता. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी तपास केला, मात्र नंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने विनय कुलकर्णी यांना आरोपी म्हणून अटक केली होती.

यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जामीन रद्द केल्यानंतर, १३ जून २०२५ पासून कुलकर्णी हे परप्पन आग्रहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, जनप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने गेल्या ८ डिसेंबर रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *