Sunday , September 20 2026
Breaking News

सीमा प्रश्नासंदर्भात समिती कार्यकर्त्याच्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

Spread the love

 

बेळगाव : 22 वर्षे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाला खादरवाडी येथील समिती कार्यकर्ते प्रकाश नेसरकर यांनी एक पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून संबंधित प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एका सामान्य समिती कार्यकर्त्याच्या पत्रामुळे सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्याने बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे राबविण्यात येत असलेल्या 1 लाख सह्यांच्या मोहिमेमुळे निश्चितच प्रभाव पडू शकतो, असा विश्वास मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केला.
सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या सह्यांच्या मोहिमेत सर्व मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाखो सह्यांचे निवेदन लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही अध्यक्ष मरगाळे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *