Sunday , September 20 2026
Breaking News

मनगटात शिवराय आणि डोक्यात भिमराव जर असतील तर कुणासमोर झुकण्याची वेळ येणार नाही : शुभम शेळके

Spread the love

 

तुडये : भीमस्वराज्य युवक मंडळ तुडये यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संस्कृतीक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी आमंत्रित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबानी केलं, शिवराय ते भीमराव, स्वराज्य ते संविधान, मनगटात शिवराय आणि डोक्यात भिमराव जर असतील तर उभ्या आयुष्यात कुणासमोर झुकण्याची वेळ येणार नाही, असे मनोगत शुभम शेळके यांनी व्यक्त केले.

1ल

कोल्हापूर जिल्हा, चंदगड तालुका आणि तुडये गाव सदैव सीमावासियांच्या पाठीशी खंबीर असल्याची ग्वाही ग्रामस्थानकडून देण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर श्री. विलास नाईक सभापती चंदगड, विलास सुतार सरपंच ग्रामपंचायत तुडये, जगन्नाथ हुलजी माजी सभापती, भरमाना गावडा, पंचायत समिती सदस्य सौ. प्रेमा जगन्नाथ हुलजी, मारुती पाटील, हनमंत पाटील तसेच युवा समिती सीमाभाग चे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, अशोक घगवे, मोतेस बारदेसकर यांच्यासह इतर मान्यवर आणि तुडये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, तुडये गावचे सरपंच तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास सुतार यांना “लढा नाहीतर गुलामीची सवय होईल” ते ब्रीद स्मृतिचिन्ह स्वरूपात देऊन भविष्यात होणाऱ्या मराठी सन्मान यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *