खानापुरात सरकारी विद्यालयात इमारतीचे भूमिपूजन! खानापूर : खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी आमचा नेहमी प्रयत्न असणार आहे. मागील सरकारच्या काळात खानापूर तालुक्यातील दोन सरकारी विद्यालयाच्या विकासासाठी तत्कालीन शैक्षणिक मंत्री सुधाकर यांच्याकडे आम्ही अर्ज विनंती केली होती. त्यानंतर देखील विद्यमान सरकारकडे आपण या दोन महाविद्यालयांच्या इमारत विकासासाठी निधीचा प्रस्ताव केला होता …
Read More »कुळाच्या वादातून दीराने केला भावजयीचा डोक्यात फावडा घालून खून; जोयडा तालुक्यातील घटना
रामनगर : कुळाच्या वादातून दीराने भावजयीच्या डोकीत फावडा घालून खून केल्याची धक्कादायक घटना जोयडा तालुक्यातील शिंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील मालंबा गवळीवाडा येथे गुरुवारी सकाळी घडली. धोंडू गंगाराम वरक (वय 55) या इसमाने आपल्या भावजय भाग्यश्री सोनू वरक (वय 32) हिला घरासमोरच डोक्यात फावड्याने मारहाण करून ठार केले. घरातील कुळाच्या हक्कावरून …
Read More »जांबोटी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराविरोधात मागासवर्गीय नागरिकांचा मोर्चा
जांबोटी : जांबोटी येथील मागासवर्गीय कॉलनीतील नागरिकांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढत पंचायतीतील भ्रष्टाचाराचा जाब विचारला. मागासवर्गीय कॉलनीच्या विकासासाठी मागासवर्गीय खात्यामार्फत आलेल्या विशेष निधीचा वापर न करता परस्पर पैसे लाटल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला. गेल्या पाच वर्षांत मागासवर्गीय कॉलनीच्या विकासासाठी गटार बांधकाम, समुदाय भवन दुरुस्ती, सोलार दिवे, विजेची थकबाकी भरणे आदी …
Read More »जांबोटी पीकेपीएस सोसायटीचे व्यवस्थापक व सचिव बेपत्ता
खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील पीकेपीएस सोसायटीचे व्यवस्थापक खंडोबा राऊत व सचिव श्रीनाथ खाडे हे अचानक बेपत्ता झाल्याने सोसायटीचे कामकाज ठप्प झाले आहे. या घटनेमुळे सोसायटीच्या दैनंदिन कामकाजावर आणि निवडणुकीत अडथळा निर्माण झाला आहे. यासाठी सोसायटीच्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी सहकारी संस्थेचे सहायक निबंधक यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार …
Read More »ओलमणी शाळेतील दोन शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने गौरव
खानापूर : तालुक्यातील हायर प्रायमरी मराठी शाळा, ओलमणी येथील दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. गुरव (रा. शिवाजीनगर, रामगुरवाडी) यांना श्री दत्त देवस्थान क्षेत्र, आडी-निपाणी यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. तर शाळेचे सहशिक्षक एस. टी. मेलगे …
Read More »गुंजी येथे ढोल-ताशाच्या गजरात “गुंजीचा राजा”चे विसर्जन
गुंजी (संदीप घाडी) : खानापूर तालुक्यातील गुंजी येथील सार्वजनिक गणेश “गुंजीचा राजा”ची मिरवणूक ढोल व ताशा अशा पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहात संपन्न झाली. सार्वजनिक श्री गणेश युवक मंडळाचे अध्यक्ष वासुदेव नागो गोरल यांच्या नेतृत्ववाखाली दि. 27 ऑगष्ट रोजी ढोल, ताशा आणि ह.भ.प. महाराज यांच्या भजनाच्या गजरात गावात संवाद्य मिरवणूक …
Read More »खानापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त : श्री. पी. बी. अंबाजी!
खानापूर : शिक्षक हा समाजाचा कणा असतो. अशा शिक्षकाच्या शैक्षणिक आयुष्यात अनेक चढ उतार येतात पण त्या चढ उतारातून देखील यशाची गुरुकिल्ली साधण्याची धडपड अनेक शिक्षकांच्यात असते. शिक्षकांना आपला विद्यार्थी एक उत्तम व चांगला घडावा हीच आकांक्षा असते. आपण जीवनात शिक्षक म्हणून काम करताना काय सार्थक केले याचा मागोवा …
Read More »चापगाव ता. खानापूर येथील युवकाचा पुणे येथे अपघाती मृत्यू
खानापूर : गेल्या काही वर्षापासून पुणे या ठिकाणी कामानिमित्त स्थायीक असलेल्या चापगाव ता. खानापूर येथील बळीराम यल्लाप्पा कदम यांचा शनिवारी रात्री कात्रज बोगद्याजवळ दुचाकीला अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी तातडीने पुणे सिल्वर बर्थ हॉस्पिटल नऱ्हे या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर उपचार झाला नसल्याने रविवारी सायंकाळी 6 …
Read More »गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा मलप्रभा नदीत बुडून मृत्यू
खानापूर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा यडोगा (ता. खानापूर) येथील मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. मृत युवकाचे नाव संजय उर्फ शुभम यल्लाप्पा कुपटेकर (वय 18 वर्ष, रा. यडोगा) असे असून तो आपल्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी चापगाव-यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीपुलाजवळ …
Read More »चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; खानापूरातील घटना
खानापूर : मारहाणीमुळे युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील माणिकवाडी गावात उघडकीस आली आहे. वेंकप्पा मल्लारी मयेकर (वय 18 वर्षे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी रुमेवाडी येथील नागराज गुंडू बेडरे व विजय गुंडू बेडरे या दोघांवर खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारदार मल्लारी विठ्ठल मयेकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta