Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूर तालुका म. ए. समिती व युवा समितीचा उत्स्फूर्तपणे सहभाग

बेळगाव (वार्ता) : आज सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीने आयोजित केलेल्या महामोर्चाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समितीने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. आपल्या न्याय हक्कासाठी व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस गोपाळराव देसाई, गोपाळ …

Read More »

काळ्यादिनी व कोल्हापूरातील धरणे आंदोलनासंदर्भात खानापूर म. ए. समितीकडून जागृती

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर काळा दिन मराठी भाषिक जनतेने गांभीर्याने पाळावा. सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी कडकडीत हरताळ पाळावा. तसेच शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते 4 पर्यंत दसरा चौक कोल्हापूर येथे सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष्य वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

वन हक्कासाठी खानापूर तहसील कार्यालयावर विराट मोर्चा

अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन खानापूर (प्रतिनिधी) : वन हक्कासाठी काढण्यात आलेल्या तहसील कार्यालयावरील मोर्चाला निवेदन स्विकारण्यास तहसीलदार रेश्मा तालिकोटी उपस्थित नव्हत्या. तालुक्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेऊन न्याय देऊ असे फोनव्दारे सांगून उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांनी निवेदन स्विकारले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक पिढ्यापासून जंगलात …

Read More »

अंगणवाडी भरती आडून कानडीकरणाचा घाट; युवा समितीकडून कार्यालयावर मोर्चा

जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेटखानापूर : बाल कल्याण खात्याच्यावतीने होत असलेल्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या भरतीआडून कानडीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत खानापूर युवा समितीने महिला आणि बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर गुरुवारी मोर्चा नेला. यावेळी खात्याचे तालुका अधिकारी राममूर्ती यांची भेट घेऊन भरती प्रक्रिया थांबविण्याचे आवाहन केले.अंगणवाडी शिक्षकांची नियुक्ती करत …

Read More »

खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना लशीबाबत आढावा

बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोरोना लशीबाबत आढावा घेतला तसेच तालुक्यातील लोकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी आरोग्य खात्यातर्फे तालुक्यातील एक लाख 62 हजार लोकांना पहिला तर 75312 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशी माहिती …

Read More »

कचरा डेपो प्रकल्पाला मिराशी वाटरे ग्रामस्थांचा विरोध

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मोहिशेत ग्राम पंचायत हद्दीतील मिराशी वाटरे गावाच्या हद्दीत सरकारच्या कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. यासंदर्भात मिराशी वाटरे गावाच्या ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रकाश हल्लणावर यांना निवेदन देऊन प्रकल्पाला विरोध केला. यावेळी निवेदनात म्हटले आहे की, …

Read More »

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून त्वरित नुकसान भरपाई द्या

खानापूर युवा समितीचे उप वन संरक्षणाधिकाऱ्याना निवेदन आंदोलनाचा इशारा खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यात वनप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांची अशी नासाडी होत असल्याने शेतकरी हतबल झाला असून वनखात्याने त्वरित वनप्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदनत खानापूर तालुका म. ए. युवा समितीकडून उप …

Read More »

खानापूर येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन

बेळगांव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजी खानापूर येथे पार पडले. उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन पुजा केली. अभिलाष देसाई यांनी स्वागत केले. त्यानंतर आमदार अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. …

Read More »

खानापूर युवा समिती व शेतकर्‍यांतर्फे सोमवारी वन खात्याला निवेदन

बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जंगली प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्यामुळेच जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा. या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व शेतकर्‍यांतर्फे सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वन खात्याच्या अधिकार्‍यांना खानापूर येथे निवेद देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने …

Read More »

कान्सुली प्राथमिक आरोग्य केंद्र उभारा; निवेदन सादर

खानापूर (प्रतिनिधी) : कान्सुली (ता. खानापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, व जनावराचा दवाखाना उभा करावा. अशा मागणीचे निवेदन जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली नागुर्डा ग्राम पंचायत अध्यक्ष बाळू बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली एमएलसी महांतेश कवटगीमठ यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नागुर्डा ग्राम पंचायत हद्दीतील कान्सुली व परिसरातील …

Read More »