Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

मराठी शाळेमध्ये मराठी विषयाच्या शिक्षकांची नेमणूक करावी

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून आंदोलनाचा इशारा बेळगाव : सीमाभागात मराठी शाळांबाबत कर्नाटकी प्रशासनाचा दुजाभाव सुरूच असून तालुक्यातील अनेक मराठी शाळांमध्ये मराठी शिक्षकांऐवजी एकमेव कन्नड शिक्षकाची नेमणूक करून जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना कन्नड अभ्यासक्रम देण्याचा अट्टाहास सुरू करण्यात आला आहे. याबाबत मराठी भाषिकांतुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच तातडीने मराठी …

Read More »

पडझड झालेल्या शाळांची पाहणी करून त्वरित डागडुजी करावी

खानापूर तालुका युवा समितीकडून मागणी बेळगाव : खानापूर तालुक्यात 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील अनेक शाळांची पडझड झाली होती. मात्र या शाळांच्या डागडुजीचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात असून याबाबत गुरुवारी खानापूर तालुका युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी पडझड झालेल्या शाळांची पाहणी करून …

Read More »

खानापूर-रामनगर रस्त्याच्या कामासाठी वनखात्याची परवानगी

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षापासुन वनखात्याने खानापूर-रामनगर रस्त्याच्या कामाला आडकाठी आणली होती. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून खानापूर रामनगर रस्त्याचे काम रखडले. त्यामुळे याभागातील ४० खेड्यातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात भाजपतर्फे खासदार अनंतकुमार हेगडे, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजपनेते शंकरगौडा पाटील वनखात्याकडून एनओसी मिळविली. त्यामुळे खानापूर-रामनगर रस्त्याच्या …

Read More »

कुत्र्यांनी हल्ला केलेल्या जखमी हरणावर उपचार

खानापूर (प्रतिनिधी) : करजगी (ता. खानापूर) गावात जंगलातुन आलेल्या हरणावर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरूवारी घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अलीकडे जंगली प्राणी अन्नपाण्याच्या शोधार्थ लोकवस्तीपर्यत येत आहेत. असाच प्रकार करजगी (ता. खानापूर) येथे गुरूवारी जंगलातून आलेल्या हरणावर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी …

Read More »

खानापूर-रामनगर रस्त्याच्या पॅचवर्कला सुरूवात

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षांपासून खानापूर- रामनगर रस्त्याचे काम रखडले. त्यामुळे या भागातील ४० खेड्यातील नागरीकांना त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात भाजपतर्फे खासदार अनंतकुमार हेगडे, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजप नेते शंकरगौडा पाटील, विठ्ठल हलगेकर यांनी रस्त्याचे काम व्हावे यासाठी प्रयत्न केले.यावेळी १० कोटीचा निधी मंजुर केला. यामध्ये …

Read More »

युवकांच्या जागृतीने आत्महत्या करणाऱ्या युवतीचे प्राण वाचले!

खानापूर (प्रतिनिधी) : युवकांच्या जागृतीमुळे खानापूर पणजी महामार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीचे प्राण बुधवारी युवकांनी वाचविले.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी एक युवती मलप्रभा नदीच्या पुलावर आत्महत्या करण्याच्या हेतून आली होती. याचवेळी येथून जाणाऱ्या इब्राहिम तहसीलदार यांना संशय आला. लागलीच त्यांनी त्या …

Read More »

९ लाख रू. निधीतून खानापूर नगरपंचायतीकडून हिंदू स्मशानभूमी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या निधीतुन स्मशानभूमीसाठी जागा पाहणी करण्यात आली आहे. कारण खानापूर शहराची लोकसंख्या सुमारे २५ हजारहुन अधिक आहे.शिवाय खानापूर शहराला एकच स्मशानभूमी आहे.तेव्हा हिंदू स्मशानभूमीसाठी मलप्रभा नदीघाटाजवळील चौदामुशीजवळील जागेवर लाखो रूपये खर्चून हिंदू स्मशानभूमी उभारण्यासाठी सोमवारी नगरपंचायतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित जागेची पाहणी करण्यात आली.यावेळी …

Read More »

शेतकरी मित्रमंडळीच्यावतीने गर्लगुंजीत विविध मान्यवरांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : शेतकरी मित्रमंडळाच्यावतीने गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे वायरमॅन नारायन पाटील (मणतुर्गा), खानापूर तालुका हेस्काॅमच्या कार्यनिवाहक अभियंत्या सौ. कल्पणा तिरवीर व लैला साखर कारखान्याचे एम. डी. सदानंद पाटील या मान्यवरांचा सत्कार गर्लगुजीचे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत कल्लापा पाटील व शेतकरी मित्रपरिवार मंडळाच्यावतीने येथील कृष्ण मंदिरात सत्कार सोहळा नुकताच पार पडला.कार्यक्रमाचा …

Read More »

लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने असोग्यात रोप लागवड

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील असोगा येथील मलप्रभा नदीच्या काठावरील श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या आवारात रोप लागवड कार्यक्रम नुकताच पार पडला.असोगा हे प्रेक्षणिय स्थळ असून या ठिकाणी अभिमान या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. आज या ठिकाणी सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या स्थळाची प्रगती झाली नाही.हे लक्षात घेऊन लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने विरेश …

Read More »

पीकेपीएस सोसायटीची उचवडे, कुसमळी, देवाचीहट्टी गावातून मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : पीकेपीएस सोसायटीची मागणी खानापूर तालुक्याच्या जांबोटी भागातील कुसमळी, देवाचीहट्टी, उचवडे या तीन गावासाठी करण्यात आली. अशा मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा डीसीसी बँकेचे चेअरमन व माजी खासदार रमेश कत्ती यांना भाजपा युवा नेता पंडित ओगले यांच्या पुढाकाराने गेलेल्या एका शिष्टमंडळाने आज बेळगाव येथे त्यांची भेट घेऊन दिले.निवेदनात म्हटले …

Read More »