खानापूर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खानापूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या यशस्वी गुनानुक्रमे पहिल्या दहा विद्यार्थ्यांचा मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने रोख रक्कम प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरिण्यात आले. जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास बेळगावकर हे होते. सुरुवातीला विद्यालयातील …
Read More »करणीबाधा करण्यासाठी चक्क जिवंत डुक्कराचा वापर!
खानापूर : खानापूर-हेम्मडगा रस्त्यावर रूमेवाडी क्रॉसनजीक विलास बेडरे व ज्योतिबा बेडरे यांच्या शेतात करणीबाधेचा प्रकार उघडकीस आला असून चक्क डुकराला जिवंत पुरण्यात आल्याचे दिसून आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर-हेम्मडगा रस्त्यावर रूमेवाडी क्रॉसनजीक विलास बेडरे व ज्योतिबा बेडरे यांची शेत आहे. दोघे बंधु नेहमीप्रमाणे आपल्या शेतात …
Read More »मराठी शाळा टिकविण्याची जबाबदारी प्रत्येकाची
युवा समितीतर्फे हलशी परिसरात शैक्षणिक साहित्याचे वितरण खानापूर : सीमा भागात मराठी शाळा टिकविण्यासाठी पालकांनी जबाबदारी घेणे गरजेचे असून मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या शाळेत विद्यार्थी कशा प्रकारे वाढतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका …
Read More »चन्नेवाडी शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी शंकर पाटील
खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील शाळा गेली अनेक वर्षांपासून बंद होती पण गावकरी व पालकांनी केलेल्या प्रयत्नांनी तसेच पाठपुराव्याने यावर्षी म्हणजेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात करण्यात आली. शाळेची नवीन शाळा सुधारणा कमिटी नेमण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी शंकर पाटील तर उपाध्यक्षपदी रेणुका दत्ताराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात …
Read More »विद्यार्थ्यांनी निभावला मतदानाचा हक्क!
खानापूर : पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सुकता सर्वांमध्येच असते. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवा वर्ग धडपड करीत असतो. मात्र शिक्षण खात्याने मतदार साक्षरता संघामार्फत शालेय मंत्रिमंडळ निवड प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते याचे धडे मिळत असून मंगळवारी हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल येथे …
Read More »बालविवाहाच्या आरोपावरून पतीला अटक
खानापूर : अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याच्या आरोपावरून बालविकास योजना अधिकाऱ्यांनी तिच्या पतीला अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले असल्याची घटना मंगळवारी खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नळ्ळी येथे घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नळ्ळी गावातील २४ वर्षीय तरुण हा मंजुनाथ डुगनावर याने …
Read More »वाढदिवसाचे औचित्य, शाळेला सुपूर्द केले क्रीडा साहित्य
बेळगाव : आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय पाटील यांनी चन्नेवाडी शाळेला क्रीडा साहित्य सुपूर्द केले. गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेली ही शाळा पालक व गावकऱ्यांच्या प्रयत्नातून २०२४ या शैक्षणिक वर्षांपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेतून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना …
Read More »खानापूर येथे अपघात; एक ठार, दोन जखमी
खानापूर : खानापूर शहरातील मऱ्यामा मंदिर नजीक, हलकर्णी क्रॉसजवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात आपल्या पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडकून दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने पाय चाकात सापडून एक जण गंभीर जखमी झाला होता. लागलीच त्याला खानापूर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून तात्काळ बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. …
Read More »डीएमएस पदवी पूर्व महाविद्यालय नंदगड येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
बेळगाव : योग मुळात एक आध्यत्मिक शिस्त आहे जी अंत्यत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे. जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रीत करते. योगामुळे शारीरिक, मानसिक विकास होतो, असे प्रतिपादन नंदगड येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव संचलित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा हन्नूरकर यांनी केले आहे. प्रारंभी …
Read More »दि. विनर्स सौहार्द सोसायटी जांबोटी, शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न
खानापूर : दि. विनर्स सौहार्द सोसायटी नियमित, जांबोटी या संस्थेचे दि. 20 जून रोजी उद्घाटन संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष व चेअरमन श्री. सुरेश गंभीर व त्यांच्या पत्नी सौ. संगीता गंभीर यांच्या हस्ते फित कापून या पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. दि. विनर्स ग्रुप ही इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारी संस्था …
Read More »