खानापूर : लैला शुगर फॅक्टरीचे पर्सनल मॅनेजर व खानापूर तालुक्यातील गुंड्यानहट्टी गावचे रहिवासी मनोहर किल्लारी (वय 45 वर्ष) दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान काल बुधवारी मध्यरात्री त्यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे लैला शुगर फॅक्टरीतील कर्मचारी वर्ग व गुंड्यानहट्टी ग्रामस्थ तसेच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोहर किल्लारी हे 15 मे 2025 रोजी, दुचाकीवरून खानापूर-बिडी मार्गावरून जात असताना, समोरून येणाऱ्या दुचाकीची व त्यांच्या दुचाकीची आमोरासमोर धडक झाल्याने या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना बेळगाव मधील विजया हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना येळ्ळूर केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचाराचा उपयोग न झाल्याने उपचारादरम्यान काल बुधवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले आहे.
लैला शुगरचे चेअरमन व खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर व लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील यांनी मनोहर किल्लारी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, एक प्रामाणिक व विश्वासू कर्मचारी आपण गमावला असल्याचे म्हणाले.