डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांशी होणार चर्चा खानापूर : जिल्हा पंचायत (झेडपी) आणि तालुका पंचायत (टीपी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी खानापूर काँग्रेसची बैठक आयोजित केली आहे. मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर …
Read More »खानापूर तालुका काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन
झेडपी-टीपी निवडणुकीसाठी आठ दिवसांची मुदत; डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनुसार प्रक्रिया सुरू खानापूर : जिल्हा पंचायत (झेडपी) आणि तालुका पंचायत (टीपी) निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर खानापूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. खानापूरच्या माजी …
Read More »खानापूर जिल्हा पंचायत, तालुका पंचायत समितीचे आरक्षण जाहीर!
महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गांसाठी जागा निश्चित; राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता खानापूर : खानापूर तालुक्यातील जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तालुका पंचायत समितीच्या २० गणांसह जिल्हा पंचायत मतदारसंघांचे आरक्षण निश्चित झाल्याने तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. आरक्षणानुसार इच्छुक …
Read More »खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी व आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करा
जिल्हाधिकारी व राज्याच्या मुख्य सचिवांकडे युवा समिती सीमाभागची निवेदन व ईमेलद्वारे मागणी खानापूर : खानापूर तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला (BEO Office) गेले दोन ते तीन महिने श्री.रामप्पा हे निवृत्त झाल्या नंतर कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नसल्याने तिथे श्री.मंजुनाथ हत्ती यांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला आहे, बी. आर. सी.(BRC) व गट …
Read More »खानापूरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन व समस्या निवारण सभा
खानापूर : खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता तालुका पंचायत कार्यालय, खानापूर येथे मार्गदर्शन व समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका पंचायत खानापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »‘सेल्फी विथ अ प्लांट’ स्पर्धेतून म. मं. ताराराणी कॉलेजचा पर्यावरण संवर्धनाचा नारा!
खानापूर : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्था संचलित ‘ताराराणी पी. यु. कॉलेज’मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी ‘सेल्फी विथ अ प्लांट’ (Selfie with a Plant) या अनोख्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला होता. तरुण पिढीमध्ये निसर्गाबद्दल आपुलकी, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा …
Read More »नागुर्डा-वाडा येथील नागेश देव महारुद्र मंदिरात चोरी
दानपेटीतील रोकड लंपास; सीसीटीव्हीची हार्ड डिस्कही चोरट्यांनी नेली खानापूर : नागुर्डा-वाडा येथील नागेश देव महारुद्र मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दानपेटीतील रोकड लंपास केली. एवढेच नव्हे, तर चोरीचा मागमूस लागू नये यासाठी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेची हार्ड डिस्कही चोरून नेली. बुधवारी रात्री घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास …
Read More »खानापूर तालुका पंचायतमध्ये पाच गॅरंटी योजनांचा आढावा
खानापूर : तालुका पंचायत खानापूर येथे आज पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. बैठकीस तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी रमेश मैत्री तसेच गॅरंटी योजना समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये पाचही गॅरंटी योजनांच्या प्रगतीचा …
Read More »पकडलेला साप जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू
खानापूर : पकडलेल्या सापाला जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे मंगळवारी घडली. बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार (39) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. विठ्ठल सुतार हे गेल्या दहा वर्षांपासून साप पकडण्याचे काम करीत होते. नागरिकांच्या घरात किंवा परिसरात साप आढळल्यास ते सुरक्षितपणे …
Read More »मराठी भाषिक अल्पसंख्याकांचे भाषिक, शैक्षणिक व सामाजिक हक्कासंदर्भात खानापूर म. ए. समितीचे विविध मागण्यांचे निवेदन
खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाकडे सात प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. भाषिक हक्कांचे संरक्षण, मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व, प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर आणि तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी समितीने केली आहे. मागण्यांवर कालबद्ध कार्यवाही न …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta