Sunday , May 19 2024
Breaking News

खानापूर

कारवार लोकसभा मतदारसंघात समिती इतिहास रचेल : आबासाहेब दळवी

  खानापूर : जोयडा तालुक्यातील मराठा समाज व मराठी भाषिकांची साथ मिळाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी रविवारी रामनगर, शिंगरगाव, वैजगाव आदी भागात प्रचार फेरी काढून …

Read More »

कारवार येथे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भव्य दुचाकी रॅली

  कारवार : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी (ता.४) कारवार येथे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासह आमदार सतिश सैल यांनी दुचाकी चालवून लक्ष वेधून घेतले. हजारो कार्यकर्त्यांनी रॅलीत …

Read More »

खानापूरात समितीचा झंझावात; निरंजन सरदेसाई यांची भव्य प्रचार फेरी

  खानापूर : लोकसभा निवडणुक मराठी भाषिकांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे मतदारांनी समितीच्या पाठीशी उभे राहुन आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी खानापूर शहरात भव्य प्रचार …

Read More »

निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारार्थ उद्या खानापूरात भव्य प्रचार फेरी

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी भव्य प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. यावेळी समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. सरदेसाई यांच्या प्रचार कार्यालयापासून दुपारी तीन वाजता फेरीला सुरुवात होणार असून शिवस्मारक, स्टेशन …

Read More »

देशाला संकटमुक्त करायचे असल्यास काँग्रेसला मतदान करा : डॉ. अंजलीताई निंबाळकर

  कारवार : देशाला संकटमुक्त करायचे असल्यास देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. मागील दहा वर्षापासून आपला देश संकटात सापडला आहे. देशात महागाईने कहर माजविला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दैनंदिन गरजा भागविणे देखील अशक्य झाले आहे, असे प्रतिपादन कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले. …

Read More »

चापगाव, कारलगा परिसरात समितीचा घरोघरी प्रचार

  खानापूर : ०२ मे २०२४ चापगाव या ठिकाणी, कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारार्थ चापगाव गावभेट दौरा व कोपरा बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकसभेचे उमेदवार श्री. निरंजन सरदेसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासी आगमन झाले, नंतर “शिवाजी महाराज की …

Read More »

अनमोड येथे म. ए. समितीचा जोरदार प्रचार

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी तिनई घाट, अनमोड आदी भाग पिंजून काढण्यात आला असून सर्वच भागातून समितीला मोठया प्रमाणात मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. समितीचे उमेदवार सरदेसाई यांच्या प्रचारासाठी गुरूवारी तिनईघाट, कातळेगाळी, देवळी, बरलकोड, जळकट्टी, दुस्की, कोणशेत, अनमोड, पारडा, …

Read More »

खानापूर – जांबोटी मार्गावर ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार

  खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावरील बाचोळी कत्री (शनया) समोर एक्टिवा दुचाकीला ट्रकने पाठीमागून ठोकल्याने एक जण ठार झाल्याची घटना आज दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील शिवठाण येथील युवक विदेश तुकाराम मिराशी (वय 28) हा आपल्या मित्रासह शुभम गार्डन येथील एका लग्न समारंभासाठी …

Read More »

कारवार जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आवळली वज्रमूठ

  कारवार : काँग्रेसमधील नेत्यांत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्याउलट भाजपच्या नेत्यांची चलबिचलता जनतेसमोर आहे. उत्तर कन्नड मतदार संघातील सर्व काँग्रेस नेते यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. भाजपचे आमदार, खासदारदेखील भाजपच्या सोबत नाही, ही भाजपच्या पराभवाची नांदी आहे, असे मत माजी खासदार मार्गारेट अल्वा यांनी …

Read More »

नंदगड भागातून समितीच्या उमेदवाराला मताधिक्य देणार

  खानापूर : नंदगड भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. बुधवारी समितीचे उमेदवार सरदेसाई यांच्या प्रचारासाठी नंदगड गावातील बाजारपेठ आणि इतर गल्लीमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला व पत्रकांचे …

Read More »