Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर

तिरुपतीहून परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

  पाच वर्षांच्या बालिकेसह चौघे गंभीर जखमी कोलार : तिरुपती येथील तिरुमला मंदिरात दर्शन घेऊन बंगळुरूकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच वर्षांच्या बालिकेसह चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी पहाटे कोलार जिल्ह्यातील केजीएफ तालुक्यातील दोड्डकारी गावाजवळ चेन्नई-बंगळुरू एक्स्प्रेसवेवर घडला. …

Read More »

शिवठाण हायस्कूलचे लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश

  शिवठाण (ता. खानापूर) : येथील श्री रवळनाथ हायस्कूलच्या खेळाडूंनी लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. सांघिक स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉलमध्ये मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. कबड्डीमध्ये मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ४x१०० मीटर रिले स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम, तर ४x४०० मीटर रिले स्पर्धेत …

Read More »

शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नव्हे, तर राष्ट्रशिल्पकार! – सीमाकवी रवींद्र पाटील

  खानापूर (प्रतिनिधी) : शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा नसून त्यांच्या विचारांना दिशा देणारा, मूल्यांची रुजवण करणारा आणि देशाची भावी पिढी घडविणारा राष्ट्रशिल्पकार आहे, असे प्रतिपादन सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. खानापूर तालुका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शिक्षक दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून …

Read More »

तेरेगाळी क्रॉसजवळ बस रस्त्याबाहेर; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

  रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्टेअरिंगचा जॉईंट तुटल्याचा आरोप खानापूर : खानापूर तालुक्यातील जामगाव–खानापूर बस रविवारी दि. ६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास तेरेगाळी क्रॉस ते शिरोली नाका दरम्यान रस्त्याच्या उतारावरून जात असताना रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे बस रस्त्याबाहेर गेल्याची घटना घडली. मात्र, बसचा वेग कमी असल्याने आणि चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी …

Read More »

सरकारी शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा : रणजीत पाटील

  खानापूर : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, तालुक्यातील अनेक सरकारी शाळांच्या इमारती जीर्ण व शिथिल झाल्या असून पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करून …

Read More »

रविवारी खानापूर तालुक्यात 8 तास वीजपुरवठा खंडित

  खानापूर : खानापूर येथील ११० केव्ही उपकेंद्रात दुसऱ्या त्रैमासिक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खानापूर तालुक्यातील विविध भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले …

Read More »

केसरेकर कुटुंबीयांच्या न्याय लढ्याला आता कायदेशीर बळ

  खानापूर एकीकरण समितीच्या पाठपुराव्याची दखल; वरिष्ठ विधिज्ञ जे. व्ही. नवले यांची नियुक्ती सांगली : कुपवाड येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत सौ. मनीषा केसरेकर आणि श्री. मोहन नागप्पा केसरेकर यांचा मृत्यू झाला. या घटनेतील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शासनाकडून मिळणारी पीडित नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या प्रक्रियेला …

Read More »

काँग्रेसच्या गॅरंटी योजनांतून खानापूर तालुक्याला ३ वर्षांत सुमारे ५५० कोटींचा थेट लाभ : डॉ. अंजली निंबाळकर

  खानापूर : काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार राज्यभर लागू केलेल्या पंचहमी गॅरंटी योजनांचा गरीब, महिला, सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाला मोठा लाभ होत असून, खानापूर तालुक्यात गेल्या तीन वर्षांत या योजनांमुळे सुमारे ५५० कोटी रुपयांचा थेट आर्थिक लाभ जनतेला मिळाला आहे, असा दावा माजी आमदार तथा …

Read More »

पहिले वेतन आणि सामाजिक भान: क्रीडा प्रशिक्षक प्रा. कपिल गुरव यांचा प्रेरणादायी आदर्श उपक्रम!

  खानापूर : आयुष्यात प्रत्येकासाठीच पहिली कमाई किंवा पहिला पगार हा अतीव आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो. या पहिल्या पगाराचा उपयोग बऱ्याचदा स्वतःच्या हौसमौजेसाठी किंवा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी केला जातो. परंतु, या सर्वसाधारण प्रवाहाच्या पलीकडे जाऊन खानापूर येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य डिग्री महाविद्यालय खानापूरचे प्राध्यापक श्री. कपिल गुरव …

Read More »

हमी योजनेच्या पाठपुराव्याला यश; चोर्ला गावासाठी बससेवा सुरू

  खानापूर : तालुक्यातील पंचहमी योजनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर मंगळवारी (ता.१) रोजी चोर्ला गावासाठी बससेवा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांसह महिला आणि कामगार वर्गाच्या सोयीसाठी सकाळच्या वेळेत बस सुरू करावी, अशी मागणी गॅरंटी योजनेच्या सदस्य प्रियांका गावकर यांनी योजनेच्या पहिल्या बैठकीपासून सातत्याने केली होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले. पंच हमी …

Read More »